अनेक संशास्पद प्रकरणे अशी असतात, ज्याची चर्चा वर्षोनुवर्ष सुरू असते. परंतु ती धसास काही लागत नाहीत. दळण मात्र सुरू राहते. दिशा सालियन या तरुणीच्या मृत्यूबाबत गेली काही वर्षे हेच सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेवर आज सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयाने ठाकरेंचा उल्लेख चक्क आरोपी म्हणून केला. या प्रकरणाचा निकाल काहीही लागो, परंतु न्यायालय या प्रकरणात आदीत्य ठाकरेंना आरोपी म्हणून पाहते आहे, ही लहान-सहान बाब नाही.