उबाठा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी एका बाजूला उभे राहतील, असे कोणी दहा वर्षांपूर्वी सांगितले असते, तर कुणाचा विश्वास बसला असता? वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने हे चित्र उभा देश पाहातो आहे. विधेयकावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या सदस्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला, अध्यक्षांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर १० खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय अध्यक्ष जगदंबिका पाल यांना घ्यावा लागला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बुळचट नव हिंदुत्व या निमित्ताने पुन्हा देशासमोर आले आहे.