सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि बोनी कपूरची यांची कन्या जान्हवी कपूर ही नुकतीच स्टाररी नाईट्स विथ कोमल नहाटा या कार्याक्रमामध्ये दिसली होती. जान्हवी कपूर सारख्या लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रीच्या आयुष्यात काय चाललंय इथे बॉलीवूड प्रेमींच्या नजरा खिळलेल्या असतात. सोबतच शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांच्या प्रेम संबंधांवरून सोशल मिडीयावर कायमच चर्चा होत असते. दरम्यान, लोकप्रिय अभिनेत्रीने तिचे लग्नानंतरचे पुढील आयुष्य कसे हवे आहे हि तिची इच्छा कोमल नहाटाच्या कार्यक्रमात व्यक्त केली.
कार्यक्रमात ती म्हणाली, मी लग्न करून तिरुमला, तिरुपती येथे माझे पती आणि माझ्या तीन मुलांसह स्थायिक होण्याची योजना आहे. आम्ही केळीच्या पानांवर जेवण करू आणि रोज ‘गोविंदा, गोविंदा’ ऐकू. मी केसात मोगरा घालीन, सकाळी मणिरत्नमचे गाणी ऐकेन आणि लुंगीतल्या माझ्या नवऱ्याला चंपी करेन, असे जान्हवी कपूर म्हणाल्या.
हे ही वाचा :
बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न कणखरपणे हाताळला जाईल?
…आता अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण!
बांगलादेशला देण्यात येणारा निधी अमेरिकेने स्थगित केला
या मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूरसोबत उपस्थित असलेला दिग्दर्शक करण जोहर अभिनेत्रीच्या लग्नाच्या प्लॅनने अजिबात प्रभावित झाला नाही. त्याने लगेच ही कल्पना नाकारली, ”मनुष्य लुंगी घालून बसून केळीच्या पानातून खातो यात काय रोमँटिक आहे?,” असा सवाल केला.
यावर प्रतिउत्तर देताना जान्हवीने तिच्या नियोजनाचा बचाव करत रोमँटिक असल्याचे ठामपणे सांगितले. होस्ट कोमल नहाटाने जान्हवीच्या या कल्पनेला दिलसे रोमांटिक म्हटले आहे. दरम्यान, जान्हवीच्या लग्नाचा प्लॅन समजल्यानंतर तिच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. अभिनेत्री शिखर पहाडियासोबत कधी लग्न करणार? हे देखील चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.