लोकशाहीत राजकीय मतभेद असू शकतात, परंतु जिथे विषय देशाच्या सुरक्षेचा असतो, तिथे तरी एक वाक्यता हवी, राजकारण नको. घुसखोरांचा मुद्दा खूपच गंभीर बनला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी बांगलादेशी असल्याचे उघड झाल्यानंतर या समस्येचे उग्र रुप ठसठशीतपणे समोर आलेली आहे. परंतु तरीही काही राजकीय नेत्यांना या मुद्द्याचे राजकारण करावेसे वाटते. ज्वलंत हिंदुत्व ते नमाजवाद, नमाजवाद ते पुन्हा हिंदुत्व असा नाट्यमय प्रवास करणारा उबाठा शिवसेना हा पक्ष त्यात आघाडीवर आहे. एके काळी दिवाळीत चिडीया नावाचा फटाका फोडला जायचा. परंतु वात पेटवल्यानंतर तो अचानक भिरभिरत कुणाच्याही धोतरात शिरत असल्यामुळे हा फटाका बॅन करण्यात आला. बांगलादेशींचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या धोतरात घुसणार हे राऊतांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे ते या मुद्द्यातील हवा काढण्याच्या