छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी सुमारे ५० किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) जप्त केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांने जिल्ह्यातील बासागुडा-आवापल्ली रस्त्यावरील पुलाखाली पेरलेला सुमारे ५० किलो आयईडी जप्त केला आहे.
सुरक्षा दलाचे पथक तिमापूर दुर्गा मंदिराजवळ असताना त्यांना माओवाद्यांनी पुलाखाली सुमारे ५० किलो वजनी आयईडी पेरल्याची माहिती मिळाली होती. अधिका-यांनी सांगितले की, माओवाद्यांनी पुलाखालील काँक्रीट आणि दगड काढून त्यामध्ये आयईडी लपवला होता, संशय येवू नये व्यवस्थितरीत्या पुन्हा त्यावर दगड बसवले होते.
हे ही वाचा :
आरोपीला हस्तक्षेप याचिका करण्याचा अधिकार नाही…
महाकुंभमध्ये रशिया, युक्रेनमधील सिद्धपुरुषांनी गायले भजन!
१५ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी, ५ महिला आणि ५ मुलांसह १७ बांगलादेशींना अटक!
अरविंद केजरीवाल यमुनेत स्नान करणार का?
आयईडीचा शोध घेण्यासाठी ‘मेटल डिटेक्टर’चा वापर करण्यात आला. यानंतर सुरक्षा दलाने आयईडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र खोलवर असल्याने आयईडी स्फोट घडवून जाग्यावरच नष्ट करण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की, मोठ्या वाहनांचे नुकसान करण्यासाठी माओवाद्यांनी पुलाखाली ‘रिमोट कंट्रोल’ ऑपरेटेड आयईडी पेरला होता. मात्र सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचे मनसुबे उधळून लावले.