श्रद्धाजंली अर्पण करून मोकळे झाले. अहो जयंतीच्या दिवशी अभिवादन करायचे असते, मुजरा केला असता तरी कौतूक झाले असते. मनात श्रद्धाभाव नसताना औपचारीकता पार पाडायला गेले की अशा चूका होतात. महाराष्ट्राचा इतिहास धगधगते यज्ञकुंड आहे, तो राहुल यांना झेपणारा नाही, कारण हा मुस्लीम आक्रमकांचे कंबरडे मोडून काढणारा हा इतिहास आहे. मुघलांचे तख्त फोडणारा इतिहास आहे. हा इतिहास मस्तकावर घेण्यासाठी रक्त, हृदय आणि मन अस्सल भारतीय असावे लागते.