काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते, गौरव गोगोई यांच्या विदेशी पत्नीची, तिच्या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय़शी कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांचे लग्न ही आता खासगी बाब राहीली नसून मामला चव्हाट्यावर आलेला आहे. इलिझाबेथ यांचा गौरव गोगोई यांच्यशी विवाह झाला २०१३ मध्ये. बाई गेली ११ वर्षे भारतात राहतायत. अजून भारताचे नागरीकत्व घेण्याची इच्छा त्यांना झालेली नाही. अजूनही त्या ब्रिटीश नागरीक आहेत, परंतु गोगोई यांच्या कालियाबोर मतदार संघात त्या प्रचाराला मात्र उतरतात. काँग्रेसमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे.