शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे या रविवारी चांगल्याच चर्चेत राहिल्या. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केल्यानंतर त्यावरून रणकंदन माजले.
नीलम गोऱ्हे या मुलाखतीत म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडिज द्याव्या लागत होत्या. या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी त्यावर टिप्पणी केली पण अनेक ठिकाणी उबाठा गटाकडून आंदोलने करत नीलम गोऱ्हे यांच्या या विधानाचा निषेध करण्यात आला. त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली.
नीलम गोऱ्हे त्या मुलाखतीत म्हणाल्या की, शिवाजी पार्कच्या सभेसाठी ठाण्यातून माणसे येत होती. त्यांची तयारी कोण करत होतं? या बाबतीत खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी त्यांना चारवेळा आमदार केले. विधान परिषदेचे उपसभापती केले. त्यांनी उद्धव ठाकरेंना चार मर्सिडिज दिल्या का? असेल तर पावत्या आणून दाखवाव्या.
यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, माझ्याकडून पक्षाने कधीही पैसे मागितले नाहीत. मला आमदारकी मिळावी म्हणून संजय राऊत यांनी प्रयत्न केले.
हे ही वाचा:
संभलमध्ये आता ३०० ‘डोळे’ चौफेर लक्ष ठेवणार!
विराटचा विजयी चौकार आणि पाकिस्तान सीमापार
डावे ढोंगी, आमच्यावर चिखलफेक करतायत
पवारांच्या ‘त्या’ कर्तृत्त्वाचा सूत्रधार कोण होता ?
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ते तर गएगुजरे आहेत. त्यांना चारवेळा आमदारकी दिली. पण त्या महिला आहेत त्यामुळे मी त्याविरोधात आणखी बोलत नाही.
या सगळ्या वादानंतर उबाठा गटाने आंदोलने हाती घेतली. नीलम गोऱ्हे यांनी केलेला आरोप पुराव्यासह सिद्ध करावा नाहीतर आम्ही न्यायालयात दाद मागू. उबाठाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, तू तिथे गेली आहेस ना मग तिथे सुखी राहा.