महीन्या भरापूर्वीची गोष्ट आहे. फर्स्ट पोस्टच्या एका कार्यक्रमात निमंत्रित म्हणून अमेरीकी अर्थतज्ञ जेफ्री सॅक्स भारतात आले होते. पल्की शर्मा उपाध्याय यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी सॅक्स यांनी भारताला अमेरिकेबाबत इशारा दिला होता. भारताने सावध राहावे, चीनला झोडण्यासाठी अमेरिका भारताचा वापर करू इच्छिते. डोण्ट प्ले अमेरीकाज गेम… असे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्यांच्या सल्ल्याचा एका महिन्याच्या आत प्रत्यय येतो आहे.
