भारताला अमेरिकेच्या सोबत ट्रेड डील हवी आहे, परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेल्या ९ जुलैच्या डेडलाईन आधी हे डील झालेच पाहीजे अशी भारताची उतावीळ भूमिका नाही. भारताने हे स्पष्ट केलेले आहे. चीनसोबत अमेरिकेचे डील मार्गी लागले आहे. भारतासोबत हे डील होईल असा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केलेला आहे. भारतासोबत या वाटाघाटी यशस्वी होण्यात कृषी, डेअरी आणि एमएसएमईच्या सोबत डेटाबाबत अमेरिकेची भूमिका अडथळा ठरते आहे. भारतीयांचा डेटा अमेरिकी कंपन्यांसाठी सोन्याची खाण बनला आहे. त्याचा उपयोग आणि दुरूपयोग दोन्ही संभव आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अर्थात एआयच्या या नव्या युगात या डेटाचे महत्व मोठे आहे.
