29 C
Mumbai
Friday, July 17, 2026
घरव्हिडीओ गॅलरीकर्नाळ्यात खिंडीत गाठण्यासाठी 'पिवळे पट्टे' |

कर्नाळ्यात खिंडीत गाठण्यासाठी ‘पिवळे पट्टे’ |

Related

आजचा विषय म्हणजे कोकणकरांच्या काळजाला हात घालणारा, त्यांच्या हाडांची आणि गाड्यांची अवस्था खिळखिळी करणाऱ्या विदारक अनुभवाचा विषय! आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो ऐकला की मणक्यात चमक निघते आणि डोक्यात तिडीक जाते! विषय आहे… मुंबई-गोवा हायवेचे स्पीड ब्रेकर! अहो, मुंबई-गोवा हायवे म्हणजे कोकणकरांसाठी जणू वनवास झालाय. वर्षानुवर्षे रखडलेला, आश्वासनांच्या खड्ड्यांनी भरलेला हा रस्ता आता कुठे तयार होतोय असं वाटत असतानाच, या महाभागांनी त्यावर असा काही नवीन प्रताप केलाय की देवच वाचवो! या हायवेवर सध्या रस्ता कमी आणि रम्बलर जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पीड रोखण्याच्या नावाखाली हायवेवर इतके रम्बलर टाकलेत, इतके रम्बलर टाकलेत की सांगताही येत नाही आणि मोजताही येत नाही! अहो, रस्ता कमी आणि रम्बलरची भुतं जास्त दिसायला लागलीत. म्हणूनच आज न्यूज डंकावर थेट सवाल विचारायचा आहे. इतके रम्बलर कशासाठी टाकलेत? या रम्बलरचे खरे गॅम्बलर कोण आहेत? कुणाचे खिसे गरम करण्यासाठी कोकणकरांच्या मणक्याचा कंडका केला जातोय? आज याचा सोक्षमोक्ष लावायचाच!

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा