29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर विशेष जुही चावलासह अन्य फिर्यादींना ठोठावला २० लाखांचा दंड

जुही चावलासह अन्य फिर्यादींना ठोठावला २० लाखांचा दंड

Related

बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला हिने भारतात 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीची लिंक का प्रसारित केली? त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी हा दावा दाखल करण्यात आला होता, हे स्पष्ट होते. त्यामुळेच चावला आणि अन्य फिर्यादींना कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल २० लाख रुपये दंड ठोठावला आहे.

जुही चावला यांच्यामार्फत लिंक सार्वजनिक केल्यामुळे सुनावणीमध्ये खूपच अडथळे आले. जुहीच्या एका चाहत्याने कोर्टाच्या सुनावणीवेळी तिच्या चित्रपटाची गाणी गायली. त्यामुळे कोर्टाचा अवमान झाल्याचेही यातून आता निष्पन्न झाले आहे.

हे ही वाचा:

बीएमसीचे ग्लोबल टेंडर हा घोटाळाच

‘आम्ही भजन करण्यासाठी पक्ष चालवत नाही’

कोरोना आजार नाही,अल्लाहची माफी मागून होईल सुटका! सपा खासदाराची मुक्ताफळे

मोदींच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली कोरोनाची दुसरी लाट आली आटोक्यात

एकूणच जुही चावला यांनी 5G विरोधात जे दावे केले होते ते तद्दन ऐकीव माहितीच्या आधारे केले होते. या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नव्हते असेही निकालात म्हटले आहे. जुही चावला यांच्यासह वीरेश मलिक आणि टीना वाचनानी (फिर्यादी) यांनी आता उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.

चावला आणि इतरांनी असा युक्तिवाद केला होता की 5Gमुळे अनेक धोके आहेत. परंतु आरटीआयच्या प्रतिसादानुसार यावर कोणताही अभ्यास केला गेला नव्हता. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले होते की, केवळ प्रसिद्धीसाठी चावला यांच्याकडून दावे दाखल केले गेले होते.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा