29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर देश दुनिया मोदींच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली कोरोनाची दुसरी लाट आली आटोक्यात

मोदींच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली कोरोनाची दुसरी लाट आली आटोक्यात

Related

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हा विषाणू सर्वाधिक घातक ठरला असता. परंतु केवळ मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील लढाई अतिशय उत्तम नियोजनाच्या आधारे लढली गेली. असे कौतुकोद्गार केंदीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले. दुसरी लाट आली असता त्याचा लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. या लाटेमध्ये अनेकांना जीवही गमवावा लागला, पण अत्यंत कमी काळात ही लाट केवळ मोदी यांच्या नियोजनामुळे आटोक्यात आली.

अनेक विकसित देशांचे कंबरडे कोरोनामुळे मोडले. परंतु भारताने मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मात्र कुठेही पिछेहाट झाली नाही. गुजरातमधील सरकारी रुग्णालयांमध्ये तब्बल ९ प्राणवायू प्रकल्प निर्मिती करण्यात आले, असेही यावेळी ते म्हणाले. अमित शहा यांनी वल्लभ यूथ ऑर्गनायझेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या क्षणी हे उद्गार काढले.

हे ही वाचा:

चिकन सूप आणि भातखळकर

अमेरिकेकडून भारताला लवकरच होणार लसपुरवठा

पंजाब सरकारकडूनच लस पुरवठ्यात नफेखोरी?

अभिनेत्री सौम्या टंडनचेही बनावट ओळखपत्र व्हायरल

सध्याच्या घडीला भारतातील दुसरी लाट ओसरू लागली आहे. तसेच रुग्णसंख्याही आता आटोक्यात आहे. प्राणवायूचा वापरही खूप कमी झालेला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असता, पूर्वीपेक्षा १० पटीने प्राणवायूची गरज वाढली होती. १० हजार मेट्रीक टन प्राणवायूची मागणी मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली. केंद्र आणि राज्य सरकारांनी हे आव्हान स्वीकारले आणि ही लढाई सुद्धा यशस्वीपणे लढली. भारतात आत्तापर्यंत २१ कोटी लोकांचे लसीकरण झालेले आहे.

तिसऱ्या लाटेचाही आपण समर्थपणे सामना करू. त्यासाठीही आपली तयारी झालेली आहे, असेही अमित शहा म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेला थोपविण्यात पंतप्रधान यशस्वी ठरल्याचे ते म्हणाले.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा