27 C
Mumbai
Sunday, September 25, 2022
घरविशेषभारतात लवकरच होणार 6G लाँच

भारतात लवकरच होणार 6G लाँच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, २५ ऑगस्ट रोजी 6G संदर्भात मोठी घोषणा केली आहे.

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, २५ ऑगस्ट रोजी 6G संदर्भात मोठी घोषणा केली आहे. देशात लवकरच 5G सेवा सुरू होणार असून आता 6G सेवाही सुरू होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या दशकाच्या अखेरीस सरकार 6G लाँच करण्याची तयारी करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या ग्रँड फिनालेमध्ये नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही घोषणा केली.

गेल्या सात ते आठ वर्षात एकापाठोपाठ एक क्रांती घडवून देश झपाट्याने प्रगती करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. “आज भारतात पायाभूत सुविधांची क्रांती झाली आहे. आरोग्य क्षेत्रात क्रांती होत आहे. तसेच डिजिटल क्रांती होत आहे.  तंत्रज्ञान क्रांती होत आहे. कृषी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर देशाचा भर आहे. कृषी आणि आरोग्य क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तरुण नवनवीन उपायांवर काम करू शकतात. आपण आपली सिंचन उपकरणे, सिंचन नेटवर्क स्मार्ट कसे बनवू शकतो यातही भरपूर वाव आहे,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

अनिल अंबानी यांनी ८१४ कोटी रुपये लपवले

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

देशातील प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच भारतात लवकरच 5G लाँच होत आहे. तसेच या दशकाच्या अखेरीस, सरकार 6G लाँच करण्याची तयारी करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
39,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा