जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) महाराणा प्रताप यांच्या चित्राच्या केलेल्या अपमानाच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. डाव्या विचारसरणीच्या काही विद्यार्थ्यांनी महाराणा प्रताप यांचे चित्र पायदळी तुडवले. ही धक्कादायक बाब लक्षात येताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या घटनेविरोधात आवाज उठवला. आपल्या नायकांचा, आदर्शांचा अपमान करून देशावर आक्रमण करणाऱ्यांचा गौरव करण्याचा डाव्यांचा मनसुबा यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड करण्यात आला.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कॅम्पस हे वाद, मोर्चे, आंदोलन यासाठी नेहमीच चर्चेत असते. असाच एक नवा वाद समोर आला आहे. जेएनयूच्या कॅम्पसमध्ये लज्जास्पद कृत्य घडल्याची बाब समोर आली आहे. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी महाराणा प्रताप यांचे चित्र पायदळी तुडवल्याचे समोर आले. यानंतर या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) आवाज उठवत याचा निषेध केला. तसेच यानिमित्ताने पुन्हा एकदा डाव्या- उदारमतवादींचे नायकांचा अपमान करा, आक्रमकांचा गौरव करा हे वास्तव समोर आणले.
हे ही वाचा..
संविधानानुसार वक्फ विधेयक मंजूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५० वा वाराणसीचा दौरा
तहव्वुर राणाला काय शिक्षा व्हावी ?
बाटलीत पेट्रोल न दिल्याने मॅनेजरला गोळ्या घातल्या!
या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर जोरदार निशाणा साधला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेएनयूमधली विद्यार्थिनी शांभवी थिटे ही या व्हिडीओमध्ये आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. महाराणा प्रताप यांच्या फोटोवर ही डाव्या विचारसरणीची मुले पाय देऊन उभे होते. देशाच्या आदर्शांचा अपमान होणार असेल तर हे चालणार नाही, असं तिने म्हणत डाव्यांनी केलेल्या कृतीबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणी तिने आपल्या भाषणातून केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या डाव्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारला असता त्यांनी मुलींशी गैरवर्तन केले, असेही तिने म्हटले. तिच्या या भाषणाला उपस्थितांनीही पाठींबा देत कृत्याचा निषेध केला आणि माफीची मागणी केली.
Video from JNU where Supporters of Left stepped on Portrait of Maharana Pratap and Insulted Him
ABVP Reacted in a Fierce Manner!
Left Liberals for You! 🔥 pic.twitter.com/0xinhZNfuC
— The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) April 9, 2025