२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक तहव्वुर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. राणाला घेऊन एक भारतीय एजन्सी टीम अमेरिकेतून निघाली असून लवकरच भारतात दाखल होणार आहे. दरम्यान, भारत सरकार याला मोठे यश मानत असताना विरोधी पक्षांकडून देखील याचे कौतुक केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) नेते माजिद मेमन यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, मोदी सरकारसाठी निश्चितच हे मोठे यश आहे. नि:संशयपणे, तहव्वुर राणा भारतात येणे हे मोठे यश आहे. या प्रकरणात अमेरिकेने खूळ वेळ घेतला आहे. त्याचे प्रत्यार्पण आधीच व्हायला पाहिजे होते. या प्रकरणात आपण काही प्रमाणात न्याय करू शकू याचा आपल्याला आनंद असला पाहिजे. ही बाब संपूर्ण जगासाठी महत्वाची आहे.
ते पुढे म्हणाले, या प्रकरणात आंतरराष्ट्रीय माणकांचे पालन केले जाईल याची आपल्याला खात्री करायची आहे. जर प्रक्रिया नियमांनुसार पुढे गेली तर तपास पथक खूप चांगले काम करेल. या प्रकरणाची सुनावणी योग्यरित्या झाली पाहिजे, असे माजिद मेमन म्हणाले.
हे ही वाचा :
भारताची निर्यात विक्रमी ८२० अब्ज डॉलर पार
भारत आणि यूकेमध्ये फ्री ट्रेड एग्रीमेंटसाठी चर्चा सुरू
ऑलिंपिकमधल्या समावेशाने रजत चौहान रात्रभर झोपले नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५० वा वाराणसीचा दौरा
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणाला पालम टेक्निकल विमानतळावरून बुलेटप्रूफ कारमधून एनआयए मुख्यालयात आणले जाणार आहे. यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे कमांडो देखील सज्ज आहेत. या प्रकरणात गृह मंत्रालयाच्या वतीने विशेष सरकारी वकील नरेंद मान यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.