लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी एका विधानामुळे अडचणीत आले आहेत. बलात्काराच्या प्रकरणावरून राहुल गांधीनी मनुस्मृतीचा उल्लेख केल्यामुळे धार्मिक गुरूंनी राहुल गांधींवर नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत, रविवारी (९ फेब्रुवारी) शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या धर्म संसदेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियावर, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी इशारा देत म्हटले आहे की, राहुल गांधींनी एका महिन्याच्या आत परमधर्म संसदेसमोर त्यांची बाजू मांडावी. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत घोषित केले जाईल.
अलिकडेच राहुल गांधी यांनी संसदेत हाथरस सामूहिक बलात्कार घटनेचा उल्लेख करत एक विधान केले होते. ते म्हणाले होते, बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला पोलिसांच्या देखरेखीखाली त्यांच्या घरात कोंडून ठेवण्यात आले आहे, तर बलात्काराचे आरोपी मुक्तपणे फिरत आहेत. ‘काही दिवसांपूर्वी मी हाथरसला गेलो होतो. चार वर्षांपूर्वी तिथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. मी त्या मुलीच्या घरी गेलो आणि त्या कुटुंबाला भेटलो. ज्यांनी सामूहिक बलात्कार केला ते बाहेर फिरत आहेत आणि मुलीचे कुटुंब त्यांच्या घरात बंद आहे.
ते पुढे म्हणाले, मुलीचे कुटुंब बाहेर जाऊ शकत नाही, गुन्हेगार त्यांना रोज धमकावत आहेत आणि ते मोकाट बाहेर फिरत आहेत. कुटुंबाने मला सांगितले की त्यांना मुलीचे अंतिम संस्कार करण्याची परवानगीही देण्यात आली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांमध्ये याबद्दल उघडपणे खोटे बोलले आहे. राहुल गांधी यांनी जोर देत म्हटले, संविधानात असे कुठे लहिले आहे, जे बलात्कार करतात त्यांनी बाहेर फिरावे आणि पिडीत कुटुंबाने घरी राहावे. ते तुमच्या पुस्तकात लिहिले आहे, मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे, संविधानात लिहिलेले नाही.
हे ही वाचा :
वादानंतर ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा
‘वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता व सद्भावना’ अभियानाचा प्रारंभ
लग्नाच्या संगीत कार्यक्रमात २३ वर्षीय तरुणी नाचता नाचता कोसळली आणि…
राहुल गांधींच्या मनुस्मृतीवरील विधानानंतर प्रयागराजचे संत-ऋषी यांनी संताप व्यक्त करत निषेध दर्शविला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये, राहुल गांधी मनुस्मृती बलात्कार्यांना संरक्षण देते असे विधान करताना दिसत आहेत. यामुळे मनुस्मृतीला पवित्र ग्रंथ मानणाऱ्या लाखो भक्तांना खूप वेदना झाल्या आहेत. ते पुढे म्हणाले, ‘त्यांच्या वतीने धर्मसद विकास पस्तानी यांनी निषेध प्रस्ताव मांडला आहे. ‘परम संसद १००८’ राहुल गांधींच्या या विधानाचा तीव्र निषेध करते आणि त्वरित आपल्या विधानाचे स्पष्टीकरण किंवा माफी मागण्याची मागणी करते. एका महिन्याच्या आता त्यांनी परमधर्म संसदेसमोर आपली बाजू मांडावी अन्यथा त्यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत घोषित केले जाईल.