अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) वर निर्बंध लादल्यापासून, संपूर्ण जगात गोंधळ उडाला आहे. यापूर्वी, ट्रम्प यांनी दावा केला आहे की हंगेरियन-अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या संस्थांना यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटकडून (USAID) $२६० दशलक्ष म्हणजेच २६ कोटी मिळाले आहेत. ट्रम्प यांचा आरोप आहे की सोरोसने या पैशाचा वापर भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांमध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी आणि राजकीय बाबींवर प्रभाव पाडण्यासाठी केला. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करून आणि दोषी आढळणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे.
भाजपा खासदार निशिकांत दुबे म्हणाले, अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएआयडी संघटना पूर्णपणे बंद केली आहे, कारण ती संघटना वर्षानुवर्षे विविध सरकारे पाडण्यासाठी पैसे खर्च करत होती. ते म्हणाले की, विरोधकांनी सांगावे की, “भारताचे विभाजन करण्यासाठी यूएसएआयडीने जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनला ५००० कोटी रुपये दिले की नाही.” त्यांनी राजीव गांधी फाउंडेशनला पैसे दिले की नाही. ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांना युएसएडने पैसे दिले कि नाही?.
हे ही वाचा :
‘राहुल गांधी माफी मागा अन्यथा हिंदू धर्मातून बहिष्कृत करू’
वादानंतर ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा
लग्नाच्या संगीत कार्यक्रमात २३ वर्षीय तरुणी नाचता नाचता कोसळली आणि…
ते पुढे म्हणाले, ‘यूएसएआयडी’ ने तालिबानला पैसे दिले कि नाही?. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र संपुष्टात आले होते. दहशतवादी आणि नक्षलवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या काही संघटनांना पैसे दिले की नाही?, हे देखील विरोधकांनी सांगावे.
हेल्पिंग हॅन्ड, फलाये इंसानियत आणि अलखिदमत, ज्यानी भारतात आतंकवादी आणि नक्षलवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचे काम केले त्यांना यूएसएआयडीने पैसे दिले कि नाही. वक्फ कायद्याला झकात फाउंडेशन जी विरोध करत आहे, त्याला काँग्रेस पक्ष पाठींबा देत आहे. यूएसएआयडीने त्याला पैसे दिले कि नाही?. देशभरात अशा अनेक संस्था आहेत, ज्यांना यूएसएआयडी पैसे देत आहे. काँग्रेस पक्ष, यूएसएआयडी आणि सोरोस फाउंडेशन मिळून देशाचे तुकडे करण्याचे विचार करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निशिकांत दुबे यांनी केली.
BIG: Parliament ADJOURNED as Nishikant Dubey drops a USAID-CONGRESS BOMBSHELL🔥
• Did USAID funnel ₹5000 Crores to Soros’ Open Society Foundation to break India❓
• Did Rajiv Gandhi Foundation, Sam Pitroda, & Zakat Foundation receive money?Look at their frustration 😂👌 pic.twitter.com/xBPeY5t9yv
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) February 10, 2025