अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत यासंबंधी माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी जाहीर केले की, त्यांना आता आखाडा किंवा त्याच्या कामकाजाशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत. तसेच ५२ वर्षीय ममता कुलकर्णी यांनी आखाड्याचे महामंडलेश्वर बनण्यास विरोध करणाऱ्यांवरही टीका केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की, मी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत असून गेल्या २५ वर्षांपासून साध्वी आहे आणि साध्वीचं राहणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या प्रयागराजमधील महाकुंभमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेतला होता. यानंतर तिला किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि अनेकांनी याला तीव्र विरोध देखील केला होता. ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं तर, किन्नर आखाड्यातूनही त्यांना काढून टाकण्यात आले होते. यानंतर आता महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे.
ममता कुलकर्णी म्हणाल्या की, “मला मिळालेला हा सन्मान तरुण पिढीला या २५ वर्षांत मी काय शिकले याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी होता. मात्र, काही लोकांना ते आक्षेपार्ह वाटले. मी २५ वर्षे बॉलिवूडपासून दूर राहिलो. हे कोण करते? इतकी वर्षे बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून कोण दूर राहते? माझ्या जीवनशैलीबद्दल लोकांची स्वतःची मते आहेत. मी महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेक लोकांनी आक्षेप घेतल्याचे मी पाहिले. यामध्ये शंकराचार्य आणि इतरांचा समावेश होता.”
“मी माझ्या गुरूंच्या म्हणजेच श्री चैतन्य गगनगिरी महाराजांच्या शिकवणींवर विश्वास ठेवते, जे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. मी माझ्या आयुष्यातील २५ वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली घालवली आहेत आणि मला तपश्चर्या करण्यासाठी कैलास किंवा हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण विश्व माझ्यासमोर आहे,” असं ममता कुलकर्णी म्हणाल्या.
तसेच किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप करणाऱ्यांचाही त्यांनी उल्लेख केला. “माझ्या महामंडलेश्वर पदाच्या विरोधात असलेल्या लोकांना अध्यात्माबद्दल काहीही माहिती नाही. त्यांच्याबद्दल जास्त काही बोलू इच्छित नाही. मला महामंडलेश्वर आणि जगत गुरुंनी भरलेल्या खोलीत रक्कम देण्यास सांगण्यात आले. जेव्हा ती रक्कम देण्यास नकार दिला आणि इतके पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा महामंडलेश्वर जय अंबा गिरी यांनी ती रक्कम माझ्या वतीने लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना दिली,” असे ममता यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :
गोवंश हत्येसंदर्भात पीआय बांगर यांच्यावर कारवाईसाठी निवेदन, कधी होणार कारवाई?
वांगचुक यांच्या पाकिस्तान भेटीमागे गूढ काय?
संजय राऊत संतापले; इंडी आघाडी फक्त ससंदेत दिसतेय
मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत आठ कॅडर्सला अटक
काही दिवसांपूर्वीचं ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्यात प्रवेश केला होता. त्यांना महामंडलेश्वर पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. यावरून वाद सुरू झाला होता. यानंतर किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी कठोर कारवाई केली. त्यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवले. त्या सोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले. तसेच दोघांचीही किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली होती.