गुन्हेगारी प्रकरणांमुळे बीड जिल्हा सध्या चांगलाचं चर्चेत असून आता गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बांगर यांनी गोरक्षकांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक बांगर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
प्रविणकुमार बांगर यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवेदन दिले आहे. पीआय बांगर यांनी अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, सर्व हिंदुत्वववादी संघटना यांच्या वतीने बीड दौऱ्यावर असलेले राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरीवरून हैद्राबाद या ठिकाणी १८ गोवंश एका आयशरमध्ये कत्तलीसाठी दाबून नेण्यात येत होते. यानंतर तो आयशर ११२ वर कॉल करून अडवला परंतु गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केला. यामुळे आमचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. शिवाय यामध्ये आर्थिक व्यवहार केल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर आणि गोरक्षक यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात एक गोरक्षक आणि पीआय बांगर संवाद साधत असल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल क्लिपनुसार, एका गोरक्षकाने बांगर यांना फोन केला असून काही म्हशींना कत्तलखान्यात नेले जात असल्याची माहिती दिली. मात्र, यावर म्हशींच्या गाडीला अडचण काय? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा दावा गोराक्षकांनी केला आहे. ‘न्यूज डंका’ या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
हे ही वाचा :
संजय राऊत संतापले; इंडी आघाडी फक्त ससंदेत दिसतेय
मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत आठ कॅडर्सला अटक
तिरुपती लाडू प्रकरण: तुपाच्या भेसळी संदर्भात चार जणांना अटक
हरियाणातील नूह येथून ५ बांगलादेशी पकडले, पश्चिम बंगालला जाण्याच्या होते तयारीत!
गोरक्षक म्हणत आहेत की, टोल नाक्याजवळ आम्ही म्हशींना घेऊन जाणारी गाडी ट्रेस केली असून आम्हाला पोलीस मदत लागेल. यावर पीआय बांगर म्हणतात, म्हशींच्या गाडीला काय अडचण आहे? पुढे गोरक्षक माहिती देत आहेत की, या दुभत्या म्हशींना कापायला घेऊन जात आहेत. आम्ही पुरावेही देतो. यावर पीआय बांगर म्हणतात, म्हशींच्या गाडीला विनाकारण रोखू नका. गोवंश मध्ये येत नाहीत त्या, असं म्हणत ते फोन ठेवून देतात. हा कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. यासोबत मेसेजही फिरत असून यात लिहिले आहे की, गेवराई पोलीस ठाण्याचे पीआय प्रविणकुमार बांगर यांना महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदाच माहीत नसून त्या कायद्यामध्ये म्हैस, रेडा, बैल, गाय, वळू यांना कत्तल करण्यास बंदी आहे. हे कसे पोलीस स्टेशन सांभाळणार हा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे. असले अडाणी अधिकारी पोलीस प्रशासन धोक्यात आणू शकतात यांना तात्काळ निलंबित करा आणि ट्रेनिंगला पाठवा.