१३ जानेवारीला सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्याला करोडो भाविकांनी भेट दिली आहे. लाखो भक्त दररोज संगमात स्नान करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आज राष्ट्रपती मुर्मू यांनी महाकुंभ मेळ्यात सहभागी होते पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. याच दरम्यान, महाकुंभ मेळ्यातील विविध आखाड्यांमधील ७,००० हून अधिक महिलांनी संन्यास दीक्षा घेतली आहे आणि सनातन धर्माची सेवा आणि संरक्षण करण्याची प्रतिज्ञा केली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली. सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, श्री पंचदशनम आवाहन आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अरुण गिरी आणि वैष्णव संन्याश्यांच्या धार्मिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी संन्यासाची दीक्षा घेतली आहे.
हे ही वाचा :
राज्यातील तलावांचे डीजिटलायझेशन होणार
प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी आराखडा बनवणार
जीवन म्हणजे परीक्षा नाही, अपयशी ठरलात तरी संधी मिळेल!
आपचा दारूण पराभव हा यमुनेच्या शापामुळे!
श्री पंचदशनम जुना आखाड्याच्या अध्यक्षा डॉ. देव्या गिरी म्हणाल्या की, यावेळी २४६ महिलांना ‘नागा संन्यासिनी’ म्हणून दीक्षा देण्यात आली. २०१९ च्या कुंभमेळ्यात ही संख्या २१० होती, जी यावेळी वाढून २४६ झाली आहे. देव्या गिरी म्हणाल्या की, यावेळी संन्यास घेणाऱ्या महिलांमध्ये उच्च शिक्षित महिलांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे.
महाकुंभात तरुणांच्या भूमिकेवर संशोधन करणाऱ्या दिल्ली विद्यापीठातील संशोधन विद्यार्थिनी इप्सिता होळकर यांना एका सर्वेक्षणात असे आढळून आले की पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानोत्सवापासून ते वसंत पंचमीपर्यंत, महाकुंभाला भेट देणाऱ्या प्रत्येक १० भाविकांपैकी ४ महिला होत्या. २०२५ च्या महाकुंभमेळ्यात महिलांचा सहभाग केवळ दर्शन आणि स्नानापुरता मर्यादित नाही तर आता त्या सन्यास घेऊन सनातन धर्माची सेवा करण्याची प्रतिज्ञा देखील घेत आहेत.