वैज्ञानिक, पर्यावरणवादी सोनम वांगचुक हे पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरात आयोजित ‘ब्रीद पाकिस्तान’ परिषदेत सहभागी झाले होते. पाकिस्तानमध्ये हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘डॉन मीडिया’ या मीडिया गटाने ही परिषद आयोजित केली होती. सोनम वांगचुक यांनी स्वतः व्हिडिओद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाल्याची पुष्टी दिली. हिमालयातील पर्यावरण रक्षणासाठी चर्चा सत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, सोनम वांगचुक हे नेमके पाकिस्तानमध्ये का गेले आहेत? त्यांच्या पाकिस्तान भेटीमागचे गूढ काय? असे प्रश्न विचारले जात आहेत.
ज्येष्ठ पत्रकार पंकज प्रसून यांनी सोनम वांगचुक यांच्या पाकिस्तान दौऱ्यामागे असलेल्या छुप्या अजेंड्याबाबत वक्तव्य केले आहे. पाकिस्तानमध्ये सर्वात मोठे मीडिया नेटवर्क असलेले ‘डॉन मीडिया’ यांनी ‘ब्रीद पाकिस्तान’ असा कार्यक्रम आयोजित केला होता. सोनम वांगचुक हे ‘डॉन मीडिया’च्या आमंत्रणावरून कार्यक्रमासाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले होते. याची माहिती त्यांनी स्वतः दिल्यानंतर पडद्यामागच्या घडामोडी मात्र वेगळ्याच असल्याचे समोर आले आहे. आमंत्रण कोणाचे होते हे त्यांनी सांगितले असले तरी त्यांच्या दौऱ्याचे फंडिंग कोणी केले हे त्यांनी सांगितलेले नाही.
माहितीनुसार, क्विल फाउंडेशनने सोनम वांगचुक यांच्या इस्लामाबाद दौऱ्याचा खर्च केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, मानवाधिकार कार्यकर्ता हर्ष मंदर यांसारखे लोक हे क्विल फाउंडेशनच्या सल्लागार मंडळात आहेत. तसेच आणखी काही विदेशी लोकांचाही फाउंडेशनच्या सल्लागार मंडळात सहभाग आहे. हिमालयात पर्यावरण रक्षण कसे करायचे यावर ही परिषद होत असल्याचे जगाला सांगण्यात आले. पण, यामागची कहाणी वेगळीच आहे. खरे तर ‘डॉन मीडिया’कडे इतके पैसे आहेत का की ते ते वांगचुक यांना खास पाकिस्तानमध्ये बोलावतील. शिवाय वांगचुक या परिषदेत भाषण देतील आणि निघून येतील.
क्विल फाउंडेशनबद्दल बोलायचे झाल्यास २०२१ साली ‘डेक्कन हेराल्ड’मध्ये एक लेख छापून आला होता. या लेखात क्विल फाउंडेशनवर काही गंभीर आरोप करण्यात आले होते. काश्मीरमध्ये दहशतवादाला फंडिंग देण्याचा एक गंभीर आरोप लेखाच्या माध्यमातून करण्यात आला होता. २०२१ मध्ये बडे उद्योजक इम्तियाझ अहमद बजाज यांना अटक झाली होती. त्यांनी म्हटले होते की, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अयुब ठाकूर याने पैसे पाठवले. पहिले अयुबने हे पैसे बजाज यांना पाठवले. पुढे बजाजने हे पैसे क्विल फाउंडेशनला पाठवले आणि दुख्तरान-ए-मिलात या संस्थेला महिलांसाठी शिलाई मशीन घ्यायला म्हणून पैसे देण्यात आले. पण, यातून शिलाई मशीन्स ऐवजी AK-47 बंदुका विकत घेऊन दहशतवाद्यांना देण्यात आल्या. हा २०२१ चा अहवाल आहे. आता अयुब ठाकूर हा क्विल फाउंडेशनच्या सल्लागार मंडळाचा सदस्य आहे.
‘ब्रीद पाकिस्तान’ची कथा अशी आहे की, तिस्ता सेटलवाड, हर्ष मंदर यांची एक संस्था इस्लामाबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित करते. याला फंडिंग मिळते ब्रिटनमधील एका उद्योजाकाकडून आणि त्यात सोनम वांगचुक यांना बोलावले जाते. हिमालयातील पर्यावरण रक्षणासाठी ही परिषद असल्याचे सांगितले जाते, पण अशी माहिती आहे की, हा कार्यक्रम म्हणजे आयएसआयचे एक ‘ब्रेन चाईल्ड’ आहे.
हे ही वाचा :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्रिवेणी संगमात केले स्नान!
आपचा दारूण पराभव हा यमुनेच्या शापामुळे!
राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेतृत्वामुळेचं काँग्रेस उद्ध्वस्त होतेय!
बांगलादेशातील हिंसाचारानंतर युनूस सरकारला आठवण झाली कारवाईची!
सोनम वांगचुक यांची भूमिका पाहिली तर ते राज्यघटनेतील सहाव्या अनुसूचीनुसार लडाखला हक्क मिळावेत म्हणून आंदोलन करत आहेत. लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केल्यानंतर लडाखचे लोक जम्मू- काश्मीरच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडणून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सहाव्या अनुसूचीनुसार लडाखमध्ये स्वायत्त संस्था बनेल आणि म्हणूनचं ही मागणी केली जात आहे. या संस्थेत चार प्रतिनिधी एलजी नियुक्त असतील आणि बाकी २६ निवडून येतील. ही संस्था लडाखच्या विकासासाठी काम करेल. ईशान्येकडील काही राज्यांमध्ये हे लागू आहे. पण, लडाख सीमेला लागून आहे. तिकडे वांगचुकस्वायत्त संस्थेची मागणी करत आहेत. शिवाय आंदोलनात एकीकडे म्हणतात की, लडाखमध्ये सैन्य आलं की त्रास होतो आणि दुसरीकडे इस्लामाबादमध्ये आयएसआयच्या कार्यक्रमामध्ये ज्याला क्विल फाउंडेशन फंडिंग पुरवत आहे अशा कार्यक्रमाला जात आहेत. दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्याचाही त्यात समावेश आहे. या कार्यक्रमाला ‘डॉन मीडिया’चा चेहरा देण्यात आला आहे. त्यामुळे ‘ब्रीद पाकिस्तान’ कार्यक्रमाच्या पडद्यामागच्या घडामोडी पाहता सोनम वांगचुक पाकिस्तानी पाहुणचार का घेत आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.