26 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरराजकारणराहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेतृत्वामुळेचं काँग्रेस उद्ध्वस्त होतेय!

राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेतृत्वामुळेचं काँग्रेस उद्ध्वस्त होतेय!

दिल्ली निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सुनावले

Google News Follow

Related

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीमध्ये खातेही उघडता आले नाही त्यामुळे त्यांची मोठी नाचक्की झाल्याचे बोलले जात आहे. अशातच दिल्ली विधानसभा निवडणुकीमधील अपयशानंतर काँग्रेसवर चोहो बाजूंनी टीका केली जात असताना आता काँग्रेसच्या माजी नेत्यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच पक्षाच्या खराब कामगिरीसाठी त्यांनी खासदार राहुल गांधी यांना जबाबदार ठरवले आहे.

काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले होते. यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीवर बोलताना आचार्य कृष्णम यांनी म्हटले की, “राहुल गांधी हे काँग्रेसची सर्वात मोठी समस्या आहेत. जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत काँग्रेसचे काहीही होऊ शकत नाही. काँग्रेसला परत आणता येणार नाही आणि राहुल गांधींना काँग्रेसमधून काढून टाकता येणार नाही. दोघेही एकमेकांना पूरक आहेत आणि राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेतृत्वामुळेचं काँग्रेस उध्वस्त होत चालली आहे,” अशी खोचक टीका आचार्य कृष्णम यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले की, राहुल गांधींसोबत असलेली सध्याची टीम ही नव शिक्यांची टीम आहे. सनातनच्या विरोधकांची ही टीम आहे. जो कोणी सनातनला विरोध करेल तो भारतीय राजकारणात फार काळ राहू शकणार नाही.

हे ही वाचा : 

बांगलादेशातील हिंसाचारानंतर युनूस सरकारला आठवण झाली कारवाईची!

संजय राऊत संतापले; इंडी आघाडी फक्त ससंदेत दिसतेय

तिरुपती लाडू प्रकरण: तुपाच्या भेसळी संदर्भात चार जणांना अटक

मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत आठ कॅडर्सला अटक

२०१५ आणि २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर, २०२५ च्या निवडणुकाही काँग्रेससाठी चांगल्या ठरल्या नाहीत. दिल्लीत ७० जागा स्वबळावर लढवणाऱ्या काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. एवढेच नाही तर संदीप दीक्षित, अलका लांबा, कृष्णा तिरथ यांच्यासह ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. तर, सत्ताधारी ‘आप’ला पराभूत करून तब्बल २७ वर्षांनी भाजपा पुन्हा राजधानीत सत्तेत आले आहे. ‘आप’नेही दिल्ली विधानसभा निवडणुकीत फरशी चांगली कामगिरी केलेली नाही. सत्ता गमावण्यासोबतच आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा