मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत आठ दहशतवाद्यांना अटक केली असून मोठ्या प्रमाणत शस्त्रसाठाही जप्त केला आहे. मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत सुरक्षा दलाला हे यश मिळाले आहे. भारतीय लष्कराने आसाम रायफल्स, मणिपूर पोलिस आणि इतर सुरक्षा दलांच्या समन्वयाने मणिपूरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये संयुक्त मोहीम राबवली होती. या संयुक्त कारवाईत आठ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि २५ शस्त्रे, दारुगोळा आणि युद्धसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सुरक्षा दलांनी ककचिंग, थौबल, तेंगनौपाल, बिष्णुपूर, इम्फाळ पूर्व आणि चंदेल जिल्ह्यात कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, आसाम रायफल्सने २ फेब्रुवारी रोजी चंदेल जिल्ह्यातील लैचिंग-दुथांग जंक्शन भागात शोध मोहीम राबवण्यात आली, ज्यात एक AK- 47 रायफल, एक देशी बनावटीची Pt 303 रायफल, एक 9 mm पिस्तूल, एक 12 बोअर रायफल, स्फोटक उपकरणे आणि अनेक स्फोटके जप्त करण्यात आली. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी, आणखी एका कारवाईत एक AK- 47 रायफल, दोन 9 मिमी सबमशीन गन, दोन पिस्तूल, एक दोन इंच मोर्टार, ग्रेनेड, दोन आयईडी आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
४ फेब्रुवारी रोजी, आसाम रायफल्सच्या जवानांनी, टेंगनौपाल जिल्ह्यातील जंगली प्रदेशात एरिया डोमिनेशन पेट्रोलिंग (ADP) दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहताच या भागातून तीन संशयित व्यक्ती पळून गेल्या त्यानंतरच्या त्यांच्या शोधात काही शस्त्रे हाती लागल्याची माहिती आहे. तर, ६ फेब्रुवारीच्या संयुक्त मोहिमेत लष्कर, आसाम रायफल्स, बीएसएफ आणि मणिपूर पोलिसांनी ककचिंग जिल्ह्यातील नोंगयाई हिल रेंजमध्ये 7.62 मिमी सेल्फ लोडिंग रायफल (SLR), एक सिंगल बॅरल गन, दोन IEDs, ग्रेनेड, दारूगोळा आणि इतर युद्धसामुग्री जप्त केली. चंदेल जिल्ह्यात, आसाम रायफल्सने गेल्जांग आणि त्यांग दरम्यान शोध मोहीम राबवली असता एक 7.62 मिमी असॉल्ट रायफल, दारुगोळा आणि इतर युद्धजन्य स्टोअर्स जप्त करण्यात आले.
७ फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत बिष्णुपूर जिल्ह्यातून एक 303 रायफल, तीन सिंगल बोअर बॅरल गन (SBBL), एक .22 पिस्तूल, एक 9 मिमी पिस्तूल, दारुगोळा आणि इतर युद्धसामुग्री जप्त करण्यात आली. तर, ८ फेब्रुवारी रोजी, विविध जिल्ह्यांमध्ये गुप्तचर माहितीच्या आधारे केलेल्या मोहिमेत आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
हे ही वाचा :
हरियाणातील नूह येथून ५ बांगलादेशी पकडले, पश्चिम बंगालला जाण्याच्या होते तयारीत!
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा!
श्रद्धा वालकरच्या अंत्यसंस्काराची वाट पाहणाऱ्या पित्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू!
थौबल जिल्ह्य़ात, काकमाईच्या भागात कांगलेपाक कम्युनिस्ट पक्षाच्या (कंगलेपाक) एका दहशतवाद्याला पकडण्यात आले. इम्फाळ पूर्वेला, तेलुच्या भागात संयुक्त कारवाईमध्ये मणिपूर नागा रिव्होल्युशनरी फ्रंट (MNRF) च्या सात कार्यकर्त्यांना पकडण्यात आले आणि एक AK- 47, दोन INSAS रायफल्स, तीन सेल्फ- लोडिंग रायफल (SLR), दारूगोळा आणि युद्धजन्य समान जप्त करण्यात आले. कारवाईनंतर जप्त केलेली सर्व शस्त्रे आणि वस्तू मणिपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.