हरियाणातील नूह येथून पाच बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. बेकादेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरुद्ध राज्यातील अनेक राज्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि आता हरियाणामधून बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच जणांच्या कुटुंबाचा समावेश आहे, ज्यामध्ये पती-पत्नी आणि तीन मुले आहेत.
सीएम फ्लाइंग स्क्वॉडने कारवाई करत पाच जणांच्या बांगलादेशी कुटुंबाला अटक केली आहे. या लोकांना अटक केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, हे सर्व बांगलादेशी वीटभट्टीत काम करायचे. हरियाणाच्या रेवाडीतून बांगलादेशी नागरिक अटक होत असल्याची माहिती मिळताच हे कुटुंब पुन्हा बांगलादेशात परतू पाहत होते. ते सर्वजण व्हिसा-पासपोर्टशिवाय नूहमध्ये राहत होते.
हे ही वाचा :
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा!
श्रद्धा वालकरच्या अंत्यसंस्काराची वाट पाहणाऱ्या पित्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू!
भाजपाच्या विजयी आमदाराने दिल्लीतील मुस्तफाबादचे नाव बदलण्याची केली घोषणा
नूहच्या गुप्तचर युनिटकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, रेवाडी येथील मुख्यमंत्री फ्लाइंग स्क्वॉडचे प्रभारी निरीक्षक राजेश कुमार यांनी नगीना येथील बरकली चौक येथून नूहकडे ऑटोमधून येणाऱ्या पाच सदस्यांच्या बांगलादेशी कुटुंबाला नगीना येथील पोलीस स्टेशन परिसरातील भदास गाव परिसरात पकडले. चौकशीनंतर या लोकांना अटक करण्यात आली.
अटक केल्यानंतर त्यांनी सांगितले कि ते येथून दिल्लीला जात होते आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर ते रेल्वेने पश्चिम बंगालला जाणार होते. कुटुंबप्रमुख इम्तियाज सांगितले की तो १०-१२ वर्षांचा असताना भारतात आला होता. पोलीस आता त्यांना न्यायालयात हजर करण्याची तयारी करत आहेत. तसेच, तीन अल्पवयीन मुलांना फरीदाबाद बालसुधार गृहात पाठवण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.