बांगलादेशात हिंसाचाराच्या नव्या लाटेला तोंड देण्यासाठी सुरक्षा दलाकडून ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ सुरु करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाका येथील घरावर हल्लेखोरांनी नुकताच हल्ला करून तोडफोड केली होती. या घटनेत अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतरच मोहम्मद युनूस सरकारने ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. देशात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
गेल्या चार दिवसांपासून देशात सुरू असलेल्या हिंसाचार आणि अशांततेप्रकरणी लष्कर, पोलिस आणि विशेष तुकड्यांचा समावेश असलेल्या संयुक्त दलांनी ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १,३०८ लोकांना अटक केली आहे. सुरक्षा दलांकडून कारवाई सुरुच आहे. याबाबत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी म्हणाले की, देशामध्ये अस्थिरता निर्माण करणाऱ्यांना कारवाईद्वारे पकडले जात आहे. जोपर्यंत अशा वृत्तीचे सर्व लोक अटक होत नाहीत तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे.
हे ही वाचा :
संजय राऊत संतापले; इंडी आघाडी फक्त ससंदेत दिसतेय
तिरुपती लाडू प्रकरण: तुपाच्या भेसळी संदर्भात चार जणांना अटक
मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत आठ कॅडर्सला अटक
भाजपाने केजरीवाल यांच्या हत्यारानेच त्यांना संपवले…
बांगलादेशमध्ये युनूस सरकारला सहा महिने पूर्ण होत असून अशा घटनां रोखण्यासाठी सरकारला आता जाग आली आहे. यापूर्वी अल्पसंख्यांक विशेषतः हिंदुंवर कट्टरवाद्यांकडून हल्ले झाले आहेत अजूनही अत्याचार होत आहे. अशा हल्लेखोरांवरही कारवाई करण्यासाठी युनूस सरकारने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.