दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला यमुना नदीचा शाप लागला म्हणून निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असे उपराज्यपाल वी. के. सक्सेना यांनी माजी मुख्यमंत्री आतीशी यांना सांगितले. राविअवारी त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. सक्सेना यांनी सांगितले की यमुना नदीच्या बाबतीत या पूर्वीच आपण केजरीवाल यांना कल्पना दिली होती.
सूत्रांच्या हवाल्याने सक्सेना यांच्या या विधानाला आतीशी यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सक्सेना यांच्या सचिवालयाने या दोघांमधील चर्चेवर कोणतीही टिपणी केलेली नाही. यमुना नदीच्या वाढत्या प्रदूषणावर एलजी यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती गठीत केली होती. त्यांनी आपले काम सुरु केले होते.
हेही वाचा..
राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेतृत्वामुळेचं काँग्रेस उध्वस्त होतेय!
बांगलादेशातील हिंसाचारानंतर युनूस सरकारला आठवण झाली कारवाईची!
संजय राऊत संतापले; इंडी आघाडी फक्त ससंदेत दिसतेय
तिरुपती लाडू प्रकरण: तुपाच्या भेसळी संदर्भात चार जणांना अटक
त्यानंतर दिल्ली सरकारकडून एनजीटीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यात वरिष्ठ वकील अभिषेक माणू सिंघवी यांनी तर्क लावला होता की या प्यानेलचे नेतृत्व डोमेन विशेषतज्ञ यांनी केले पाहिजे. या स्थगितीला आता दोन वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका बैठकीत सक्सेना यांनी केजरीवाल यांना सांगितले होते की तुम्हाला यमुना नदीच्या शापाचा सामना करावा लागेल. २०१५ मध्ये केजरीवाल यांनी पाच वर्षात यमुना नदी स्वच्य करण्याचे वचन दिले होते. मात्र त्यावर ठोस कारवाई करण्यात ते अयशस्वी ठरले. हाच निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा ठरला. भाजपकडून या विषयाची खिल्ली उडवण्यात आली. लोकांना या बद्दल आठवण करून देण्यात आली.