राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभात दाखल होत पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. राष्ट्रपतींसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. राष्ट्रपतींनी संगम बेटावर बोटीने प्रवास केला आणि पक्षांना खावू घातले. दरम्यान, राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
सोमवारी (१० फेब्रुवारी) सकाळी प्रयागराजमध्ये पोहोचल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले. येथून राष्ट्रपती अरैल घाटावर पोहोचल्या, तेथून त्रिवेणी संगमला पोहोचल्या. राष्ट्रपतींनी गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणीच्या पवित्र संगमात पवित्र स्नान करून संपूर्ण जगाला एकता आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला.
वैदिक मंत्रांचा जप करत त्यांनी पूर्ण श्रद्धेने त्रिवेणी संगमात स्नान केले. पवित्र स्नान करण्यापूर्वी, राष्ट्रपतींनी त्रिवेणी संगमावर फुले आणि नारळ अर्पण केले आणि अर्घ्य (पाणी) अर्पण करून भगवान सूर्याला नमस्कार केला. वैदिक मंत्र आणि श्लोकांच्या जप दरम्यान, त्यांनी संगम स्थळी पूजा केली आणि आरती केली. त्यानंतर संपूर्ण राष्ट्राच्या समृद्धी आणि शांतीसाठी त्यांनी प्रार्थना केली.
हे ही वाचा :
आपचा दारूण पराभव हा यमुनेच्या शापामुळे!
राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेतृत्वामुळेचं काँग्रेस उद्ध्वस्त होतेय!
बांगलादेशातील हिंसाचारानंतर युनूस सरकारला आठवण झाली कारवाईची!
संजय राऊत संतापले; इंडी आघाडी फक्त ससंदेत दिसतेय
देशाच्या पहिल्या नागरिकाचा संगमात स्नान करण्याचा हा एक ऐतिहासिक क्षण होता. कारण याआधी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही महाकुंभात पवित्र स्नान केले होते. राष्ट्रपती मुर्मू अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरालाही भेट देवून पूजा करणार आहेत.