जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत. यानंतर, सुरक्षा दलांनी एका वनक्षेत्राजवळ शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिरानगर परिसरात एका नागरिकाने तीन संशयास्पद व्यक्तींना पाहिले आहे. या माहितीनंतर सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. परिसरात आणि महामार्गावर दक्षता वाढवण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे पथक पूर्णपणे सतर्क आहे. दरम्यान, राज्यात कुठेही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास शोध मोहीम सुरू केली जाते. या शोध मोहिमेत लष्करासोबतच स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जाते.
जम्मू आणि काश्मीरमधील अनेक भागात भारतीय लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफकडून दहशतवादविरोधी शोध मोहीम राबविली जात आहे. कठुआ, किश्तवार आणि सांबा या जंगली भागात संशयास्पद दहशतवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर २७ मे पासून ही संयुक्त कारवाई सुरू आहे, जी कठुआच्या लोवांग आणि सार्थल सारख्या भागात सहाव्या दिवशीही सुरू आहे.
हे ही वाचा :
श्रेयसच्या फटकेबाजीचा पाऊस, मुंबई वाहून गेली; पंजाब फायनलमध्ये
राजीव शुक्ला बनणार बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष?
रायगडावर सापडला ‘हा’ ऐतिहासिक ठेवा!
बांगलादेशच्या नोटांवरून शेख मुजीबुर रहमानचा फोटो हटवला!
किश्तवारच्या शिंगपोरा भागात २२ मे रोजी सुरू झालेल्या ‘ऑपरेशन त्राशी’ मध्ये एक सैनिक हुतात्मा झाला. यावेळी चार दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. यासह १५ मे रोजी पुलवामाच्या नादर त्राल भागात आणखी एका शोध मोहिमेत तीन दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल अलर्ट मोडवर आहे, प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून आहे.
