बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी लवकरच निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अशा स्थितीत उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या अंतर्गत सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
👉 बीसीसीआयच्या नियमांनुसार ७० वर्षांनंतर पदाधिकाऱ्यांना पद सोडावे लागते.
🚨 सूत्रांची माहिती:
“राजीव शुक्ला काही महिन्यांसाठी कार्यभार सांभाळतील. सीनियर ननव्हाइस प्रेसिडेंट म्हणून ते नियमांनुसार हे काम करणार आहेत.”
जर त्यांची नियुक्ती झाली, तर ३ महिन्यांसाठी अंतरिम अध्यक्ष म्हणून ते जबाबदारी पार पाडतील, जोपर्यंत कायमस्वरूपी अध्यक्ष निवडला जात नाही.
🔹 राजीव शुक्ला यांचा क्रिकेट प्रशासकीय प्रवास:
-
२०२० पासून बीसीसीआय उपाध्यक्ष
-
२०१७ पर्यंत यूपीसीएचे सचिव
-
२०१८ पर्यंत आयपीएलचे अध्यक्ष
🔸 रॉजर बिन्नी: बीसीसीआयच्या नेतृत्वात एक खेळाडू
-
१९८३ च्या विश्वविजेत्या संघातील सदस्य
-
२७ टेस्ट आणि ७२ वनडे भारतासाठी खेळले
-
१९८३ वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १८ विकेट्स
-
२०२२ मध्ये बीसीसीआयचे ३६वे अध्यक्ष म्हणून नियुक्त
-
सौरव गांगुली यांच्यानंतर अध्यक्षपद मिळाले
📌 थोडक्यात:
-
बीसीसीआयमध्ये लवकरच नेतृत्वात बदल होण्याची शक्यता
-
राजीव शुक्ला यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी
