27 C
Mumbai
Saturday, October 12, 2024
घरविशेषबाणडोंगरी डीपी रोड; भातखळकरांची आणखी एक वचनपूर्ती

बाणडोंगरी डीपी रोड; भातखळकरांची आणखी एक वचनपूर्ती

नागरिकांची हायवेच्या वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Google News Follow

Related

गेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आज बाणडोंगरी डी.पी. रोडच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या रस्त्याच्या कामामुळे कांदिवली ते मालाड आणि मालाड ते कांदिवली ये-जा करणे कमीतकमी वेळेत शक्य होणार असून हा प्रश्न आता कायमचा मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले. बाणडोंगरी डी.पी. रोडच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

आमदार भातखळकर म्हणाले, सुरुवातीपासून हा डी.पी. रोड व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर खूप पाठपुरावा केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एकत्रित भेटी या कामासाठी घडवून आणल्या. अनेक नियम, कायदा या सगळ्या चौकटीतून या रस्त्याच्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. १८ मीटर रुंद आणि ४५० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. याचा परिसरातील रहिवाशांना खूप फायदा होणार आहे. कांदिवली ते मालाड असेल किंवा मालाड ते कांदिवली असेल नागरिकांना हायवे वरूनच प्रवास करावा लागत होता. आता या डी.पी. रोडमुळे अत्यंत सुटसुटीत, सहज ये-जा करता येणार आहे. यातून वेळेची बचत होणार आहेच शिवाय पेट्रोलचीही बचत होणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा..

रोट्या बनवण्यापूर्वी आलम त्यावर थुंकायचा, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

दगडफेक करणाऱ्या जम्मू- काश्मीरच्या लोकांच्या हातात आता पुस्तकं, पेन दिसतायत

ख्रिश्चन धर्मांतराला रोखण्यासाठी हनुमान यज्ञ

लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?, सलमान खानच्या वडिलांना महिलेकडून धमकी !

आमदार भातखळकर म्हणाले, मुंबई शहर आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे जास्तीत जास्त डी.पी. रोड, सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्वाचे आहे. या रस्त्याचे काम होत असताना स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून रस्त्याचे काम जलद होण्यासाठी मदत होईल. यावेळी पी नॉर्थ विभागाचे वॉर्ड अधिकारी किरण दिघावकर, आरपीआयचे पोपटशेठ धनवट, सर्व माजी नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा