१३ जानेवारी रोजी सुरु झालेला महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. महाकुंभमध्ये दररोज लाखो भाविक सहभागी होत असून करोडो भाविकांनी स्नान केले आहे. महाकुंभ मेळ्यात परदेशातील लोकही सहभागी होत आहेत. याच दरम्यान, भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे देखील महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. त्यांनी संगमात स्नान केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भूतानचे राजा लखनौहून एकत्र प्रयागराजला पोहोचले. यानंतर, दोघेही विमानतळावरून रस्त्याने संगम किनाऱ्यावर पोहोचले. इथे पोहोचल्यानंतर, दोघेही अरैल घाटावरून बोटीत बसले आणि संगमला पोहोचले आणि स्नान केले. यादरम्यान, भूतानचे राजा आणि मुख्यमंत्री योगी यांनी पक्ष्यांना खाऊही घातला. पवित्र स्नान आणि गंगा पूजनानंतर, भूतानचे राजा झोपलेल्या हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी आले. याशिवाय त्यांनी अक्षयवट गाठून प्रार्थनाही केली.
हे ही वाचा :
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना विभागात ८८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप
खिचडी घोटाळा प्रकरणातील आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाणांना जामीन मंजूर
पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभाला देणार भेट, संगमात करणार स्नान!
मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महाकुंभमध्ये आतापर्यंत ३५ कोटी भाविकांनी स्नान केले आहे. या आकडा ४५ कोटींपर्यंत वाढणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. वसंत पंचमी दिवसानिमित्त २.३३ कोटी भाविकांनी संगमात स्नान केले आहे. याव्यतिरिक्त दररोज लाखो भाविक महाकुंभात सामील होत आहेत.