24 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरविशेषदिल्ली निवडणुकीनंतरच भाजपला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष!

दिल्ली निवडणुकीनंतरच भाजपला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष!

राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक १० ते २० फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता

Google News Follow

Related

नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. भाजपा सध्या राज्य आणि जिल्हा स्तरावर अध्यक्षांची नियुक्ती करत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतरच राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही निवडणूक १० ते २० फेब्रुवारी दरम्यान  होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा दिल्ली निवडणुकीदरम्यान भाजपचे नेतृत्व करणार आहेत.

राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्येच संपला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो वाढवण्यात आला. सध्या भाजपामध्ये संघटनेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. तसेच विभाग, जिल्हा आणि प्रदेश अध्यक्षांची निवड केली जात आहे.

यासह राष्ट्रीय परिषद आणि प्रदेश परिषदेचे सदस्य देखील निवडली जात आहेत. हे सर्व राष्ट्रीय अधाक्षांच्या निवडीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतील. परंतु, आतापर्यंत केवळ चार राज्यांमधील प्रदेश अध्यक्षांचीच निवड झाली आहे. भाजपाच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी किमान ५० टक्के पक्ष संघटनेच्या निवडणुका पूर्ण होणे आवश्यक आहे. भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार संघटनात्मक निवडणुका वेळापत्रकानुसार सुरू असून त्या वेळेवर पूर्ण होतील.

हे ही वाचा : 

कानपूरमध्ये १,६७० मालमत्तांवर वक्फ बोर्डाचा दावा

उत्तर प्रदेश: सपा नेत्यावर बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल!

सैफ अली खान वर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, ठाण्यातून अटक

भारताचे दोन्ही खो-खो संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत

दरम्यान, दिल्लीत एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार आहे. ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुका आता पुढे ढकलण्याचे कारण म्हणजे पक्षाला दिल्ली निवडणुकीवर पूर्ण लक्ष द्यायचे आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा