27.8 C
Mumbai
Friday, August 7, 2026
घरविशेषमहिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष

दिल्ली न्यायालयाचा निर्णय

Google News Follow

Related

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी (३ ऑगस्ट) निर्दोष मुक्त केले. या प्रकरणातील सहआरोपी आणि डब्ल्यूएफआयचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी (एसीजेएम) अश्विनी पंवार यांनी सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला. या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने २ जुलै रोजी निकाल राखून ठेवला होता. हे प्रकरण सहा महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित आहे. जानेवारी २०२३ मध्ये नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या काळात ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा आणि आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर जून २०२३ मध्ये पोलिसांनी विविध कलमांखाली आरोपपत्र न्यायालयात सादर केले. पुढे मे २०२४ मध्ये ट्रायल कोर्टाने पाच महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींची दखल घेत बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळ आणि महिलेच्या सन्मानाला धक्का पोहोचवल्याचे आरोप निश्चित केले होते. त्यानंतर या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू होती.

या प्रकरणात एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूनेही बृजभूषण यांच्याविरोधात आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्यावर ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर संबंधित कुस्तीपटूने आपली तक्रार मागे घेतली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणात ‘कॅन्सलेशन रिपोर्ट’ दाखल केला आणि पॉक्सो प्रकरण बंद करण्यात आले.

हे ही वाचा:

पाकिस्तानात रॅलीवर आत्मघाती हल्ला

रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्यास दंड!

तेल स्वस्त, बाजार मस्त! सेन्सेक्स ७९ हजारांच्या उंबरठ्यावर

मोदींना शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ १५ वर्षीय मुलीविरुद्ध गुन्हा नाही

अखेर सोमवारी राऊज अव्हेन्यू न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि सुनावणीतील युक्तिवादांचा विचार करून बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाचा निकाल जाहीर होण्यापूर्वी बृजभूषण शरण सिंह सकाळी राऊज अव्हेन्यू न्यायालयात उपस्थित झाले होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. निकालापूर्वी यावर मी काहीही बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा