25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरविशेषबस उलटून २ शाळकरी मुलांना गमवावे लागले प्राण

बस उलटून २ शाळकरी मुलांना गमवावे लागले प्राण

रविवारी रात्री लक्झरी बस उलटून अपघात झाला

Google News Follow

Related

मुंबईत दर रोज वेगवेगळे अपघात होतच राहतात. पण हा अपघात थरकाप उठवणारा आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात रविवारी रात्री लक्झरी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर ४८ जण जखमी झाली.

रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठच्या सुमारास रायगडमध्ये ही घटना घडली. चेंबूरमधील मयंक कोचिंग क्लासेसची ही सहल एका लक्झरी बस मधून जात होती. ही बस लोणावळ्याहून चेंबूरच्या दिशेने जात होती. बसवरून चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला  या अपघातात दोन शिक्षकांसह दहावीचे एकूण ४८ विद्यार्थी बसमध्ये उपस्थित होते. हा भीषण अपघात खोपोली घाटाच्या मॅजिक पॉइंटवर घडला. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात त्वरित दाखल करण्यात आले, जेथे हृतिका खन्ना (१७) आणि राज म्हात्रे (१६) यांना मृत घोषित करण्यात आले, तर इतरांवर उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या निष्कर्षांवर आधारित पोलीस पुढची कारवाई करतील.

हे ही वाचा:

गोपीनाथ मुंडे : जनसामान्यांचा नेता

भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

अनिल देशमुख्यांच्या जामिनावर टांगती तलवार

नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव

“आम्ही विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून घटनाक्रम नेमका काय आहे हे जाणून घेऊ आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई करू. या क्षणी, आमचे प्राधान्य हे सुनिश्चित करणे आहे की बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुरक्षित आहेत अथवा नाहीत ,” एका अधिकाऱ्याने सांगितले. एका अधिकाऱ्याने असे ही सांगितले की, या घटनेमुळे तेथे बरीच वाहतूक कोंडीही झाली होती. महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू होण्यापूर्वी त्यांना बस एका बाजूला हलवावी लागली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा