25 C
Mumbai
Wednesday, January 7, 2026
घरविशेषअमेरिकेत ४ लाख कमावण्यापायी ५० लाख गमावले!

अमेरिकेत ४ लाख कमावण्यापायी ५० लाख गमावले!

अमेरिकेने हद्दपार केलेल्या महाराष्ट्रातील तरुणाला बसला फटका

Google News Follow

Related

अमेरिकेने हद्दपार केलेल्या १०४ भारतीय नागरिकांपैकी तीन महाराष्ट्रातील आहेत. भारतात दाखल झाल्यानंतर अनेकजण आपला प्रवास सांगत आहेत. ज्यामध्ये त्यांना प्रवासादरम्यान आलेला अनुभव, तेथील परिस्थिती, खर्ची झालेले पैसे अशा गोष्टींचा समावेश आहे. याच दरम्यान, नागपुरातून बेकायदेशीर डंकी मार्गाने अमेरिकेत गेलेल्या तरुणाची माहिती आता समोर आली आहे. हरप्रीत सिंह ललिया असे तरुणाच नाव आहे.

३४ वर्षीय हरप्रीत सिंह ललियाचा नागपुर शहरात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. कॅनडामध्ये टॅक्सी चालवून महिन्याला ४ लाख रुपये कमवले जातील या हेतूने त्यांनी नागपूर सोडण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एजंटला दोन टप्प्यांमध्ये सुमारे ५० लाख रुपये दिले होते. विशेष म्हणजे, एवढी मोठी रक्कम जमा करण्यासाठी त्याने सोने, दोन ट्रक विकले होते तर काही पैसे मित्रांकडून उधार घेतले होते. तरुणाने खटपट केली मात्र, हाती निराशा आली.

हरप्रीत सिंह ललियाचा यांनी आपला ६२ दिवसांचा शेअर केला. या प्रवासादरम्यान डोंगराळ, जंगली प्रदेशातून तासनतास रिकाम्या पोटी चालण्याच्या आणि पैसे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे तस्करी माफियाने एका सहकारी बेकायदेशीर स्थलांतरिताला गोळ्या घालून ठार मारल्याच्या आठवणींनी सांगितल्या.

हरप्रीतने सांगितले, कॅनडाचा व्हिसा तयार करण्यात आला. पण अगोदर इजिप्तला पाठवण्यात आले. गेल्यावर्षी २ डिसेंबर रोजी इजिप्त गेलो. तेथून स्पेनची राजधानी माद्रिदला पाठवले. येथून माझे साहित्य कॅनडाला पाठवण्यात आले. मात्र, मला विमानाने दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमालाला नेण्यात आले, असे हरप्रीतने म्हटले.

हे ही वाचा : 

चेंबूर माहुल गाव येथून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक!

मनोरुग्णाच्या हल्ल्यात पोलीस अंमलदार जखमी, सेल्फी पॉईंटवरील घटना!

युनूस सरकार विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा!

हिंदू मुलीचा लग्नास नकार, मोहम्मदने तरुणीसह कुटुंबाला पेटवले!

याठिकाणी बंदूकधरी माफियासोबत राहिल्याचे त्याने सांगितले. गवाटेमाला २७ डिसेंबर पर्यंत थांबविले होते. २७ डिसेंबरला ग्वाटेमाला मधून निकारागुवाला येथे विमानाने नेण्यात आले. निकारागुवा मधून बाय कारने हौंडूरासला नेले. तिथून पुन्हा सडक मार्गाने ग्वाटेमालमधील दुसऱ्या निर्जन ठिकाणी आणले गेले. नदी क्रॉस करून मेक्सिकोमध्ये प्रवेश झाला. मेक्सिकोमध्ये मेक्सिकोसिटी नंतर हरमासिलो येथे १० दिवस माफियांच्या ताब्यात राहावे लागले. तिथून सडक मार्गाने पनास्को, मेक्सिकेला नेले. यावेळी सतत बंदूकधारी माफी सोबत असल्याचे हरप्रीतने सांगितले.

तो पुढे म्हणाला, साडे चार तास पायी चालून मेक्सिको-अमेरिका बॉर्डर क्रॉस करण्यात आली. अमेरिकेत प्रवेश केल्यानंतरही १६ तास पायी प्रवास होता. आमच्यासोबत गुजरातमधील एक कुटुंब होते. याच दम्यान, अमेरिकी सुरक्षा दलांकडून अटक झाली आणि २२ जानेवारी रोजी त्यांना सॅन दिएगो तुरुंगात नेले. आम्हाला हातकड्या घालून चार दिवस दहशतवाद्यांसारखे ठेवण्यात आले.

१२ दिवसांसाठी आम्हाला चिप्स, सफरचंद आणि रस एवढेच मिळाले. येथून भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. भारतात परत पाठवण्याच्या प्रक्रियेदरम्यान विमान काही ठिकाणी थांबले. मात्र ते कोणते ठिकाण होते याची कुठलीही माहिती नाही, असे हरप्रीतने सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा