हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील सुंदरनगर मधील जारोल विधानसभा मतदारसंघात भाजप खासदार कंगना राणौत यांनी एका सभेला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान, कंगना राणौत यांनी काँग्रेसवर टीका केली आणि सांगितले की २०१४ पूर्वी २जी घोटाळा, कोळसा घोटाळा आणि चारा घोटाळा यासह अनेक घोटाळे झाले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि त्यांच्यावर एकही डाग नसल्याचे म्हटले.
कंगना राणौत म्हणाल्या, काँग्रेसच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. त्यामुळे अशा घटनांमुळे राजकारणी म्हटले कि चोर म्हणून आम्ही त्याला ओळखायचो. युवा पिढी तर थकली होती, आपण देश सोडून दुसरीकडे कुठेतरी जावे, असे वाटत होते. त्या पुढे म्हणाल्या, आज आपले नेते मोदीजी पहा. त्यांच्यावर एकही डाग नाही. ‘चांद पर दाग होता है, लेकिन पीएम मोदी पर एक भी दाग नहीं है’ (चंद्रावर डाग असतो पण पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही). यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
हे ही वाचा :
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जखमी मुलासाठी मोदींनी केली मदत
चीनला आमंत्रण देणाऱ्या बांगलादेशचे नाक भारताने दाबले!
वक्फ विधेयकाला विरोध: मुर्शिदाबाद हिंसक निदर्शनांनंतर २२ जण अटकेत
सबिनाची झाली सुमन, पतीच्या छळाला कंटाळून महिलेने केले हिंदू मुलाशी लग्न!
त्या पुढे म्हणाल्या, भाजप आणि आरएसएसची विचारसरणी सनातन, राष्ट्रवाद, वसुधैव कुटुंबकम यांचे अनुसरण करते, ज्याचे आपण बऱ्याच काळापासून पालन करत आहोत. २०१४ पूर्वी अनेक घोटाळे झाले होते. ज्यामध्ये २जी घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा इत्यादींचा समावेश आहे.
यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आणि आरोप केला की राज्याची अवस्था वाईट आहे आणि याला “लांडग्यांच्या” तावडीतून मुक्त करण्याची गरज आहे.