आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर काल (८ एप्रिल) सिंगापूरमधील एका शाळेत लागलेल्या आगीत जखमी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात त्याच्या हाता-पायांना दुखापत झाली होती. तर धुरा धुरामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे सिंगापूरला रवाना होत त्यांनी आपल्या मुलाची भेट घेतली आहे. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवर चर्चा करत उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मदत केली आहे.
जनसेना पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगीच्या घटनेत जखमी झालेल्या मार्क शंकरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. धुराचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी चाचण्या केल्या जात आहेत आणि त्याची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.
पवन कल्याण म्हणाले की, या कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वैयक्तिकरित्या फोन करून सांत्वन दिले आणि सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही फोनवरून संपर्क साधून चिंता व्यक्त केली.
हे ही वाचा :
चीनला आमंत्रण देणाऱ्या बांगलादेशचे नाक भारताने दाबले!
वक्फ विधेयकाला विरोध: मुर्शिदाबाद हिंसक निदर्शनांनंतर २२ जण अटकेत
सबिनाची झाली सुमन, पतीच्या छळाला कंटाळून महिलेने केले हिंदू मुलाशी लग्न!
ममता बॅनर्जी म्हणतात, प. बंगालमध्ये वक्फ (दुरुस्ती) कायदा लागू करणार नाही
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्वीटरवर पोस्ट करून सिंगापूरच्या शाळेत लागलेल्या आगीच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, ‘शंकरच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.’ त्याच्यावर सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीच्या घटनेत एका १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि पवन कल्याणच्या मुलासह २० जण भाजले आहेत.