28.2 C
Mumbai
Sunday, June 22, 2025
घरविशेषबालपणीचा ताण मेंदूवर खोल परिणाम करतो

बालपणीचा ताण मेंदूवर खोल परिणाम करतो

Google News Follow

Related

एका नवीन अभ्यासानुसार, बालपणातील ताणतणाव आणि कठीण अनुभव मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करू शकतात. लहानपणी झालेली मानसिक आघातं मेंदूवर स्थायी प्रभाव टाकू शकतात आणि पुढे जाऊन मानसिक विकारांचं कारण ठरू शकतात. या संशोधनात असं नमूद करण्यात आलं आहे की, बालपणातील अडचणी मेंदूच्या संरचनेत आणि रोगप्रतिकारक शक्तीत कायमस्वरूपी बदल घडवून आणतात, ज्यामुळे डिप्रेशन (उदासीनता), बायपोलर डिसऑर्डर आणि इतर मानसिक आजारांचा धोका वाढतो.

इटलीतील मिलान येथील IRCCS ओस्पेडाले सॅन रॅफेलच्या वरिष्ठ संशोधिका सारा पोलेटी यांनी सांगितलं की, “रोगप्रतिकारक प्रणाली केवळ संसर्गाशी लढत नाही, तर ती आपल्या मानसिक आरोग्याला आकार देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांनी सांगितलं की, बालपणीचा ताण रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये बदल घडवून आणतो, आणि त्यामुळे अनेक दशकांनंतरही मानसिक विकारांचा धोका वाढतो. या अभ्यासात अशा विशेष प्रकारच्या ‘सूज निदर्शकां’ची (Inflammatory Markers) ओळख पटली आहे, जे बालपणातील तणावाशी संबंधित आहेत.

हेही वाचा..

मनीष सिसोदियांना दुसऱ्यांदा समन्स

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तब्बल ९५ विदेशी प्राण्यांची तस्करी करणारा अडकला पिंजऱ्यात

साप-मुंगूसाच्या हाणामारीत चिलटाची मध्यस्थी

‘ब्रेन मेडिसिन’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात मूड डिसऑर्डर (उदासीनता आणि इतर मानसिक विकार) वर उपचार करण्यासाठी इम्यूनोमॉड्युलेटरी एजंट्स (Interleukin-2) वापरण्यावर भर देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मूड डिसऑर्डर हे जगभरात अपंगत्व, आजारपण आणि मृत्यू यासाठी मुख्य कारणे आहेत. भविष्यात डिप्रेशनचे प्रमाण सुमारे १२ टक्के, तर बायपोलर डिसऑर्डरचे प्रमाण २ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.

अभ्यासात हेही आढळले की, मूड डिसऑर्डरमध्ये रोगप्रतिकारक यंत्रणेतील बिघाड, विशेषतः सूज संबंधित प्रतिसाद प्रणाली, एक महत्त्वाची भूमिका बजावते. ही सूज ही विकारांची मुळं असू शकते. या सूजन निदर्शकांमुळे मानसिक आजारांवर नवे आणि प्रभावी उपचार विकसित करता येतील. हे निदर्शक डॉक्टरांना आजाराच्या मूळ कारणांचा शोध घेण्यास आणि योग्य उपचार करण्यास मदत करतील. सारा पोलेटी यांचं म्हणणं आहे की, त्या रोगप्रतिकारक प्रणाली आणि पर्यावरण यांच्यातील संबंध अजून सखोलपणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा उद्देश असा आहे की, बालपणी तणावग्रस्त अनुभव असलेल्या लोकांमध्ये मानसिक विकारांचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक धोरणं विकसित करावीत. हा अभ्यास मानसिक आरोग्य सेवांचा अभ्यास आणि प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
252,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा