27 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरविशेषदिल्लीपुढे न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी करतायेत!

दिल्लीपुढे न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी करतायेत!

भाजपा महिला आमदार चित्रा वाघ यांची जोरदार टीका

Google News Follow

Related

उबाठा गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार येतील, जातील, पण संबंध राहिले पाहिजेत. तसेच पुढचा विचारही केला पाहिजे, यासाठी राहुल गांधी आणि केजरीवालांची भेट घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

आदित्य ठाकरेंच्या या  भेटीवरून सत्ताधारी नेत्यांकडून टीका केली जात आहे. दिल्लीपुढे न झुकणारे आता दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत, असा टोला भाजपा महिला नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. तसेच बाळासाहेबांना भेटायला जे ‘मातोश्री’वर जायचे त्यांचे नातू म्हणजेच आदित्य ठाकरे हे दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करत आहेत, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांच्या मौनावारही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

चित्रा वाघ म्हणाल्या, ज्यांच्या आजोबांना नेते ‘मातोश्री’वर भेटायला यायचे, त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय. मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का..?. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर दररोज टीका करणाऱ्या उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा चित्रा वाघ साधला.

हे ही वाचा : 

वक्फ विधेयक: जेपीसीच्या अहवालातील विरोधकांच्या नोंदींना आक्षेप नाही!

सामंथा पॉवरने बेकायदेशीर इमिग्रेशन आणि सेन्सॉरशिपची सोय केली

गुजरात पोलिसांनी १५ बांगलादेशींना केले हद्दपार!

नवे आयकर विधेयक लोकसभेत सादर

चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात, पण आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का? की यावरही काहीतरी चमत्कारिक स्पष्टीकरण येणार का..!

आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत! महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा..?. आजोबांचे तरी स्मरण ठेवा, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा