29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषवाढत्या तापमानातील हवामान बदलाचा खोल समुद्रातील ४० टक्के प्रजातींना धोका

वाढत्या तापमानातील हवामान बदलाचा खोल समुद्रातील ४० टक्के प्रजातींना धोका

सागरी जीवनावर गंभीर परिणाम होण्याची भीती

Google News Follow

Related

हवामान बदल हा जागतिक पातळीवर गंभर विषय बनत चालला आहे. हिमनगांपासून ते नाड्यांपर्यंत आता याचे गंभीज परिणाम जाणवू लागले आहेत. अलीकडेच केलेल्या पाहणीनुसार आता खोल समुद्रावर देखील याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. ,एका ताज्या अहवालानुसार वाढत्या हवामान बदलाच्या परिणामांमुळे या शतकाच्या अखेरीस समुद्रातील २०० ते १००० खोल क्षेत्रात अधिवास असलेल्या २० ते ४० टक्के प्रजाती नष्ट होऊ शकतात अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
समुद्रामध्ये २०० ते १,००० मीटर खोलीवर असेलला भाग हा ट्वायलाइट झोन म्हणून ओळखला जातो. समुद्रात खोल असलेल्या या भागात अनेक प्रजातींचा अधिवास असतो. ब्रिटनच्या काही विद्यापीठातील संशोधकांनी जगभरातील एकूणच हवामान बदलाचा अभ्यास केला आहे. या हवामान बदलांचा सागरी जीवनांवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर या संशोधकांनी हि भीती व्यक्त केली आहे.उत्सर्जन जास्त झाल्यास पुढील १५० वर्षांत सागरी जीवसृष्टीवर ज्या प्रकारे परिणाम होईल त्याची भरपाई काही हजार वर्षांपर्यंत करता येणार नाही असा धोक्याचा इशाराही या संशोधकांनी दिला आहे.

या संशोधकांच्या अभ्यासानुसार, समुद्राच्या तळाशी फारच कमी बाह्य प्रकाश समुद्राच्या संधिप्रकाश क्षेत्रापर्यंत पोहोचतो.त्यामुळे तेथे अनेक प्रजाती आढळतात. तसेच येथे अब्जावधी टन सेंद्रिय पदार्थ आहेत. ट्वायलाइट झोनबद्दल फारच कमी प्रमाणात अभ्यास केला गेले आहेत, परंतु इतिहासाच्या अनुभवाच्या आधारे भविष्याचा अंदाज लावला जाऊ शकतो असे मत या संशोधकांनी व्यक्त केलं आहे.

कार्डिफ विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल पिअरसन यांच्या म्हणण्यानुसार या अभ्यासादरम्यान पृथ्वीवरील पाच दशलक्ष वर्षे आणि १५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या दोन उष्ण कालखंडासाठी मिळालेल्या पुराव्यांचे विश्लेषण करण्यात आले. ट्वायलाइट झोनमध्ये उपस्थित असलेल्या प्रजातींना विकसित होण्यासाठी लाखो वर्षे लागली आहेत. हा झोन फ्रीझप्रमाणे काम करतो. आता हवामान बदलामुळे ज्या प्रकारे तापमान वाढत आहे, त्यामुळे ते धोक्यात आले असल्याचे मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे.

भारतात येण्यासाठी आता दुबईत अडकलेल्या अभिनेत्रीला हवाय पासपोर्ट

निवासी, अनिवासी मालमत्ता विकून मिळाला १० वर्षातला विक्रमी महसूल

सुदानमधून आलेले विमान उद्ध्वस्त झालेल्या धावपट्टीवर उतरले

युक्रेनच्या अनेक शहरांवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांत २५ जणांचा मृत्यू

जीडीपीमध्ये होऊ शकते ३० टक्के घट
हवामानातील असामान्य बदलांबाबत गांभीर्य दाखविले नाही आणि कार्बन उत्सर्जन आता जसे आहे तसे सुरू राहिले तर भारताच्या अर्थव्यवस्थेत २१०० साला पर्यंत ३० टक्क्यांनी घाट होऊ शकते. इतकेच नाही तर २०७० पर्यंत भारतातील कृषी उत्पादन आणि मत्स्य उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते अशी भीती आशियाई विकास बँकेच्या अहवालात व्यक्त केली आहे. भारत सरकारने २०७० पर्यंत नेट झिरो म्हणजे कार्बन उत्सर्जनाचे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताला जीडीपीच्या तुलनेत २.५ टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करावा लागणार असला, तरी हा प्रयत्न आवश्यक आहे असलयाचे आशियाई विकास बँकेला म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा