31 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरविशेषमुंबईत चोवीस तासांत ढगफुटीसदृश्य पाऊस

मुंबईत चोवीस तासांत ढगफुटीसदृश्य पाऊस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

Google News Follow

Related

मुंबईत मागील ६ तासांत २०० मिलामीटर आणि २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे ५२५ पंप कार्यान्वित आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी (१९ ऑगस्ट ) मुंबई महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन शहर आणि उपनगरातील पावसाचा आढावा घेतला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदीची पाहणी केली तसेच कुर्ला येथील क्रांतीनगर व विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मिठी नदीची पाण्याची पातळी ३.९ मीटरपर्यंत वाढली आहे, त्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगरमध्ये पाणी शिरले. येथील जवळपास ३५० लोकांना महापालिकेने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या ठिकाणी रहिवाशांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईत ६ मुख्य पंपिंग स्टेशन्स आणि १० मिनी पंपिंग स्टेशन्स आणि ५२५ पंप कार्यरत आहेत. ६ तासांत २०० मिलामीटर आणि २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला. कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले. सगळीकडे यंत्रणा सज्ज असून पालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहेत, असे ते म्हणाले. घाटकोपर, मुंब्रा आणि विक्रोळी पार्कसाईट येथे जिओ नेटिंगचे काम करण्यात आले आहे. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता शहर आणि उपनगरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवावी लागले. यासाठी महापालिका नियोजन करत आहे. मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा बंद असली तर बेस्टकडून प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

हे ही वाचा  : 

मुख्तार अब्बास नकवी यांचा राहुल गांधींवर निशाणा

राहुल गांधी विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार?

राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

बी. सुदर्शन रेड्डी इंडी आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा