28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरविशेषसत्ताधारी पक्षांनी केलेल्या महाराष्ट्र बंदमुळे राज्यातील जनता संतापली

सत्ताधारी पक्षांनी केलेल्या महाराष्ट्र बंदमुळे राज्यातील जनता संतापली

Related

उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेसाठी महाराष्ट्रात बंदची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांबद्दल राज्यातील सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष दिसला. आधीच कोरोनामुळे गेले दीड-दोन वर्षे लॉकडाउनमध्ये गेल्यानंतर आता कुठे महाराष्ट्रात हळूहळू सगळे व्यवहार सुरू झालेले असताना बंदची घोषणा केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे.

शाळा, कार्यालये सगळे सुरू झालेले असताना एक दिवसाचा बंद करून सरकारमधील पक्षांनीच एक दिवसासाठी हे सगळे थांबविले. बंदची घोषणा केल्यामुळे सकाळपासून लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. कार्यालयात जाण्यासाठी कोणती वाहने उपलब्ध आहेत याविषयी लोकांना कोणतीच माहिती नव्हती. ठाण्यात तर रिक्षाचालकांना मारहाण करून प्रवाशांना रिक्षातून उतरविण्यात आले. रिक्षा चालकांच्या कानशिलात लगावणे, काठीने त्यांना मारहाण करणे या प्रकारांमुळे जनतेत भीतीचे वातावरण होते. दादरला स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी टॅक्सीचालकाकडून टॅक्सीच्या चाव्याच हिसकावल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. अनेक ठिकाणी टायर जाळून रस्ते अडविण्यात आले तर राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्ते अडवून रहदारीला अडथळा निर्माण केला.

दुकाने व आस्थापनाही जबरदस्तीने बंद करण्यात आल्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रभर घडून आले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता कुठे व्यवसायाचा जम बसविण्याच्या तयारी असलेल्या दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने बंद ठेवली तर अनेकठिकाणी शिवसैनिकांनी दुकाने बंद करायला भाग पाडले.

 

हे ही वाचा:

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला

…म्हणून भारत-चीन चर्चेची १३वी फेरी ठरली अपयशी!

‘काकांचं दुःख सतावत असल्यामुळेच बंदचा कांगावा’

‘राष्ट्रीय सुरक्षेसाठी अंतराळ क्षेत्रात खासगी गुंतवणूक हवी’

 

सोशल मीडियावर मात्र या बंदविरोधात लोकांनी जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्याची काय गरज होती, असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला गेला. महाराष्ट्रात गेल्या वर्ष दीडवर्षात घडलेल्या घटनांसाठी का बंद केला नाही, असाही सवाल लोक सोशल मीडियावर विचारत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा