30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरविशेषदिवाळीच्या सुट्ट्यांवरून शिक्षण विभागाचे निघाले दिवाळे

दिवाळीच्या सुट्ट्यांवरून शिक्षण विभागाचे निघाले दिवाळे

Related

शालेय शिक्षण विभागाने गेल्या काही महिन्यात घातलेल्या गोंधळात आता नव्या घोळाची भर पडली आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्यांवरून दोन वेगवेगळी पत्रके काढल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी सगळ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. १ ते २० नोव्हेंबर अशी सुट्टी एका पत्रकात नमूद करण्यात आली असून सरकारच्या शासन निर्णयात २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा या दिवाळी सुट्टीचा कालावधी नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे नेमकी कोणती सुट्टी खरी हे कळायला मार्ग नाही.

अनेक शाळांमध्ये सहामाही परीक्षा ३० ऑक्टोबरपर्यंत आहे. ती परीक्षा सुरू असताना आता सरकारच्या शासन निर्णयाचे पालन करायचे तर शिक्षकांनी २८ तारखेपासून सुट्टीवर तरी कसे जायचे असा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून १ ते २० नोव्हेंबर असा सुट्टीचा कालावधी नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षा आणि सुट्ट्यांचे नियोजन शिक्षकांनी केलेले आहे. अनेकांनी २० तारखेपर्यंत बुकींग केलेली आहेत. पण आता शासन निर्णयाप्रमाणे जर १० नोव्हेंबरपर्यंतच सुट्टी असेल तर पुढील दिवसांचे बुकींग केलेल्या शिक्षकांपुढे आता शाळेत उपस्थित राहायचे की सुट्टीवर राहायचे हा संभ्रम निर्माण झाले आहे.

 

हे ही वाचा:

आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर

प्रशांत किशोर म्हणतात, पुढील अनेक दशके भाजपाच

अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?

प्रभाकर साईलला कोणत्या ऑफर आल्या ते तपासा!

 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे १० नोव्हेंबरपासून निपुण भारत हा केंद्र सरकारचा उपक्रम प्रत्येक राज्यात सुरू करायचा आहे. त्यासाठी शिक्षकांना आता या उपक्रमात सहभागी व्हावे लागणार आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल तर शिक्षकांनी या उपक्रमात कसे सहभागी व्हायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

राज्याला शिक्षणमंत्री किती?

शाळांना दिवाळीची सुट्टी २८ ऑक्‍टोबर ते १० नोव्हेंबर व १ ते २० नोव्हेंबर यापैकी नेमकी कोणती आहे, असा शाळांचा गोंधळ उडाला आहे. ही दोन्ही परिपत्रके राज्याच्या एकाच शिक्षण विभागाने जारी केली आहेत. राज्याला शिक्षण मंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहीत नसावे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारच्या या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,511अनुयायीअनुकरण करा
4,870सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा