दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका जगासमोर स्पष्ट करण्यासाठी खासदारांचे सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळ परदेशात जाणार आहे. या प्रतिनिधिमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा समावेश करण्यात आल्यावर काँग्रेस पक्षातूनच यावर आक्षेप नोंदवण्यात येऊ लागला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “काँग्रेस हा पक्ष असा बनून गेला आहे की जिथे देशहितावरील सकारात्मक मुद्द्यांवर बोलायलाही कोणी पुढे येत नाही. काही सकारात्मक, देशहिताचं राजकारण असलं तर हे गप्प राहतात.
ते पुढे म्हणाले, “काँग्रेस फक्त नकारात्मक राजकारण करते. देशाबाहेर जाऊनही हे भारताला बदनाम करतात. आता जेव्हा परदेशात प्रतिनिधिमंडळ जात आहे आणि त्यात शशी थरूर आहेत, तर त्यात राजकारण करण्यासारखे काय आहे? शशी थरूर हे स्वतः काँग्रेसचेच आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असेही सांगितले की, काँग्रेसच्या आतल्या गटबाजीचे हे उदाहरण आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीही राहिलेली नाही आणि आता त्यांनी खालच्या पातळीवरचे राजकारण सुरू केले आहे.
हेही वाचा..
प. बंगालात बनावट आधार रॅकेटचा पर्दाफाश
भारतविरुद्ध जाणे बांग्लादेशसाठी योग्य नाही
सरस्वती विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना कलमा म्हणायला लावला, मुस्लीम शिक्षिकेची हकालपट्टी!
दहशतवाद्यांनंतर काँग्रेसला आता नक्षलवाद्यांचाही कळवळा…
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, “पाकिस्तान आज दहशतवादी देश म्हणून ओळखला जातो. भारताच्या लष्कराच्या शौर्याने हे दाखवून दिले आहे की, हा दहशतवादी देश नामशेष होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. पण भारताचा जो शत्रूराष्ट्र आहे, त्याला जे देश समर्थन देतात, त्यांच्याबद्दलही भारतातील जनतेमध्ये रोष आहे. कोणताही देश असो – तुर्की किंवा दुसरा कोणताही – जो भारताच्या शत्रूला मदत करतो, तो भारतासाठी हितकारक ठरू शकत नाही.
केंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्या सात सर्वपक्षीय संसदीय प्रतिनिधिमंडळांमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची नावे निश्चित केली आहेत. हे प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सदस्य देश आणि इतर प्रमुख सहयोगी देशांना भेट देतील आणि भारताची दहशतवादविरोधी भूमिका, लष्करी कारवाया आणि “ऑपरेशन सिंदूर” यांची माहिती देतील.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील समूह क्र. ५ अमेरिका, पनामा, गुयाना, ब्राझील आणि कोलंबिया या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या प्रतिनिधिमंडळात एलजेपी (रामविलास) च्या खासदार शांभवी, झारखंड मुक्ति मोर्चाचे डॉ. सरफराज अहमद, टीडीपीचे जी. एम. हरीश बालयोगी, भाजपचे शशांक मणी त्रिपाठी व भुवनेश्वर कलिता आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. अमेरिकेत भारताचे माजी राजदूत तरनजीत सिंह संधू आणि भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचाही सहभाग असेल.
