29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर विशेष महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ९७ हजारांपेक्षा अधिक

महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ९७ हजारांपेक्षा अधिक

Related

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. असे असले तरीही सध्याचे चित्र मात्र एकदम वेगळे आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय, तर दुसरीकडे मात्र वाढती मृत्यूसंख्या ही गोष्ट राज्यासाठी आता डोकेदुखी ठरत आहे. राज्यातील मृतांची संख्या ही तब्बल ९७ हजारांच्या वर गेली. त्यामुळे राज्यापुढे आता हे मृत्यू रोखणे हे एक आव्हान आहे.

राज्यामध्ये दिवसाला जवळपास ४०० ते ७०० जण मृत्यूमुखी पडत आहेत. दरम्यान देशभरातून झालेल्या मृत्यूपैकी २० टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक मृतांची नोंद यामध्ये झालेली आहे. मुंबईतील मृतांचा आकडा १४ हजार ९६५ तर पुण्यातील मृतांचा आकडा १२ हजार ७३७ इतका आहे. ठाण्यात ८२५५ तर नागपूरमध्ये ६७८७ इतकी मृतांची संख्या आहे. महाराष्ट्रात आजवर ५८ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गुरुवारी नोंदविलेल्या ३०७ मृत्युंपैकी २२८ हे एका आठवड्यातील आहेत.

हे ही वाचा:

बीएमसीचे ग्लोबल टेंडर हा घोटाळाच

…आणि मोसाद स्टाइल चोक्सी झाला जेरबंद!

ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला

सिद्धू विरुद्ध अमरिंदर वाद पुन्हा टोकाला?

आजवर सर्वाधिक मृत्यू झालेले राज्य म्हणून महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र- ९७ हजार ३९४ मृत्यू, कर्नाटक- ३० हजार १७ मृत्यू, दिल्ली- २४ हजार ४०२ मृत्यू, पंजाब- १४ हजार ७४८ मृत्यू. एकूणच ही मृतांची संख्या राज्यासाठी आता डोकेदुखी ठरू लागलेली आहे. ठाकरे सरकारने टाळेबंदी केली रुग्णसंख्या त्यामुळे आटोक्यात आली. मग नेमके हे मृत्यू कशामुळे होताहेत हा शोध घेणेही आता गरजेचे आहे. राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असता, औषधांचा तुटवडा यासारख्या गोष्टी तर या मृत्यूला कारणीभूत नाहीत ना हे शोधणे आता गरजेचे आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा