इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आल्यानंतर सध्या राज्यात वाद सुरु आहे. सरकारने हिंदी सक्तीची केली नसून ती ऐच्छिक ठेवण्यात आली आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु, यावरून सध्या राजकारण केले जात आहे. याच मुद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आवाज उठवत याला कडाडून विरोध केला आणि सरकारने हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर आंदोलन करू असा इशारा दिला होता.
आता याच मुद्यावरून, मनसेच्या विरोधानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देखील यामध्ये उडी घेतली आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा माकपने सरकारला दिला आहे. दरम्यान, माकपच्या इशाऱ्याला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर देत टोला लगावला. ते म्हणाले, आपल्या राजकीय निष्ठा रशिया आणि चीनच्या चरणी वाहणाऱ्या कम्युनिस्ट पक्षांनी महाराष्ट्रातील भाषेच्या त्रिसूत्री विषयी रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नये आणि ते त्यांना झेपणारे नाही.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणावरून माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले म्हणाले, पहिली ते पाचवी हिंदी भाषा सक्तीला माकप, विचारवंत, बुद्धीजीवी आणि इतर पक्षांनी तीव्र स्वरुपात विरोध केला होता. जनतेचा आणि पक्षाचा विरोध लक्षात घेता अशा प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले होते. मात्र, आता शुद्धीपत्रक काढून २० विद्यार्थ्यांची अट पुढे करत मागील दाराने का होईना हिंदी सक्तीचे धोरण दांडगाई करत राज्यात रेटले जात आहे. माकपने या सक्तीला विरोध केला आहे.
हे ही वाचा :
ओसामा विसरलात का?” शशी थरूर यांचा डोनाल्ड ट्रम्पना टोमणा
तन-मनासाठी वरदान ठरणारा सूर्यनमस्कार
आसाममध्ये लव्ह जिहाद, हिंदू तरुणीने केली आत्महत्या!
निर्याती संधींमुळे भारतात हरित हायड्रोजनची मागणी किती वाढणार ?
भाषा सल्लागार समिती आणि शिक्षण सुकाणू समितीच्या अनेक सदस्यांनी सुद्धा या गोष्टीला विरोध केला आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी माकपकडून करत आहोत. सरकारने असे केले नाही व आपले एकारलेपणाचे व सांस्कृतिक दांडगाईचे धोरण पुढे सुरूच ठेवले तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समविचारी पक्ष संघटना, बुद्धिजीवी, विचारवंत, कवी व लेखक यांना सोबत घेत या विरोधामध्ये पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन करू, असा इशारा अजित नवले सरकारला दिला.
माकपच्या इशाऱ्याला उत्तर देत अतुल भातखळकर ट्वीटकरत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याला विरोध करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, हिंदी ऐवजी रशियन किंवा चिनी भाषा शिकवली गेली असती तर त्याचे मात्र स्वागतच केले असते. आपल्या राजकीय निष्ठा रशिया आणि चीनच्या चरणी वाहणाऱ्या कम्युनिस्ट पक्षांनी महाराष्ट्रातील भाषेच्या त्रिसूत्री विषयी रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नये. ते त्यांना झेपणारे नाही.
महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याला विरोध करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, हिंदी ऐवजी रशियन किंवा चिनी भाषा शिकवली गेली असती तर त्याचे मात्र स्वागतच केले असते.
आपल्या राजकीय निष्ठा रशिया आणि चीनच्या चरणी वाहणाऱ्या कम्युनिस्ट… pic.twitter.com/bHIKn7eAOF— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 19, 2025
