दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांविरुद्ध विशेष शोध मोहीम सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना ओळखणे, त्यांना हद्दपार करणे आणि अटक करणे ही प्रक्रिया वेगवान केली आहे. बोगस मतदान रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरील कॅमेरे बांगलादेशी घुसखोरांवर लक्ष ठेवणार आहेत. यामध्ये संशयित आढळून आल्यास तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करत त्यांची बांगलादेशला रवानगी करण्यात येणार आहे.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि त्यानंतर बांगलादेशशी बिघडणारे संबंध लक्षात घेता, सरकार कठोर भूमिका घेत असल्याचेही म्हटले जात आहे. दिल्लीत बांगलादेशी घुसखोरांविरुद्धची मोहीम १० डिसेंबर २०२४ रोजी एलजी व्हीके सक्सेना यांच्या आदेशावरून सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये दिल्लीत राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले होते.
हे ही वाचा :
कोईम्बतूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात जर्मन पर्यटकाचा मृत्यू
जीएसटी परिषद कर दर तर्कसंगत करण्याच्या निर्णयाच्या जवळ
टाटा मोटर्सच्या सरव्यवस्थापकपदी शंतनू नायडू
द्वारका जिल्ह्यातील बेकायदेशीर अतिक्रमण पाडण्याविरोधातील याचिका फेटाळली
आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी ५८ हून अधिक बांगलादेशींना हद्दपार केले आहे आणि ८ जणांना अटक केली आहे. निवडणूक आयोगाच्या सतर्कतेमुळे आणि उपराज्यपालांच्या आदेशांमुळे, दिल्लीत २०० हून अधिक संशयित घुसखोरांची ओळख पटली आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर हे केवळ सुरक्षेसाठी धोका नाही तर स्थानिक नागरिकांच्या रोजगारावर, सरकारी योजनांवर आणि मतदार यादीवरही परिणाम करू शकतात. दरम्यान, अशा घुसखोरांवर प्रशासन कारवाई करताना दिसत आहे. देशासह अनेक राज्यात असे घुसखोर बांगलादेशी आढळून आले आहेत.