देशासह राज्यभरात बांगलादेशी-रोहिंगे घुसखोरांवर कारवाई सुरु आहे. भारतात बेकादेशीररीत्या शिरकाव करून भारतीय कागदपत्रे बनवून ते १५-२० वर्षे राहत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. पोलीस दल विशेष मोहीम राबवत अशा घुसखोरांवर कारवाई केली जात आहेत. या प्रकरणावरून भाजपा, हिंदू संघटनांकडून वारंवार आवाज उठवला जात आहे. याच दरम्यान, हिंदू जनजागृती समितीने मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात ८० लाख ते १ कोटी तर मुंबईत आठ ते दहा लाख बांगलादेशी घुसखोर असल्याचा दावा समितीने केला आहे. बांगलादेशी घुसखोर नारळपाणी, भाजी, मासे आणि भंगार विक्रीसारखी कामे करत असल्याचे समितीने म्हटले आहे.
सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत हा दावा केला. नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातही बांगलादेशी घुसखोर हिंदूंची नावे लावून वास्तव्य करत असल्याचे अभय वर्तक यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
दिल्ली निवडणुका: बोगस मतदान रोखण्यासाठी प्रयत्न, बांगलादेशी घुसखोरांवर नजर!
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्या माध्यमं पेरतात!
कोईम्बतूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात जर्मन पर्यटकाचा मृत्यू
टाटा मोटर्सच्या सरव्यवस्थापकपदी शंतनू नायडू
धारावी पुनर्विकास प्रकल्पात लाखो घरांची निर्मिती होणार आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून यामध्ये बांगलादेशींची घुसखोरी होवू शकते, असे हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी म्हटले. अशा घुसखोरांना शोधून काढण्यासाठी समितीच्या वतीने राज्यात आंदोलने, मोर्चे, स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या मोहिमेत जनतेनेही सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.