29 C
Mumbai
Monday, October 3, 2022
घरविशेषती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

Related

ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकाची बोट असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे एक संशयास्पद बोट सापडल्यानंतर आणि त्यात एके-४७ रायफल्स आढळल्यानंतर त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात स्पष्टीकरण दिले.

फडणवीस म्हणाले की, १८ ऑगस्ट रोजी हरिहरेश्वर येथे १६ मीटर लांबीची बोट स्थानिक मच्छिमारांना मिळाली. त्यांनी पोलिसांना कळविल्यावर तपासणी करण्यात आली. त्यात ३ एके ४७ रायफल व त्यांचा दारुगोळा मिळाला तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे मिळाली. या घटनेनंतर किनारपट्टीवर नाकाबंदी करण्यात आली. तात्काळ कोस्ट गार्ड व संबंधित यंत्रणांना कल्पना देण्यात आली.

फडणवीस यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडी हान असून ऑस्ट्रेलियन नागरीक हाना लॉन्डर्सगन यांची ती बोट आहे. तिचे पती बोटीचे कप्तान आहेत. मस्कतहून युरोपकडे ही बोट जात होती. पण अचानक बोटीचे इंजिन निकामी झाले आणि बोट भरकटू लागली. तेव्हा कोरियन युद्धनौकेने खलाशांची सुटका केली. समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोइंग करता आले नाही. भरकटत ती हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे.

हे ही वाचा:

कसे करावे शिवलीलामृत पारायण ?

हरिहरेश्वर येथे अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ

‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’

रोहिंग्यांचा पुळका मोदींचा दणका

 

सदर घटनेचा तपास एटीएस व स्थानिक पोलिस करत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचे आदेश आहेत. कोस्ट गार्डशी संपर्क सुरू असून पुढील तपास बारकाईने करण्यात येतो आहे, असेही फडणवीस म्हणाले. तपासात कमी राहू नये म्हणून नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सणांचे दिवस आहेत म्हणून काळजी घेतली जात आहे. केंद्रीय यंत्रणा आपल्यासोबत संपर्क ठेवून आहेत. केंद्रीय यंत्रणांनी ही माहिती खरी असल्याचे म्हटले आहे.

रायगडमधील हरिहरेश्वर येथील समुद्रात एक अज्ञात बोट सापडली होती. त्यात तीन एके ४७ रायफली आणि जिवंत काडतुसे सापडल्यामुळे खळबळ उडाली. ही बोट ओमानच्या नेपच्युन मेरिटाइम  सिक्युरिटीजची असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. त्यांची बोट भरकटल्याची माहिती या कंपनीकडून देण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा